शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वीज ग्राहकांचे ८२ लाख रूपये पुन्हा ग्राहकांच्या खात्यात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:19 IST

वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात वीज ग्राहकांकडून घेतलेला धनादेश आल्या नंतर संबंधित वीज ग्राहकाच्या वीजबिलातून ती रक्कम कमी करून तो धनादेश वीज वितरणच्या खात्यात जमा करण्या ऐवजी तो न वटल्याचे दाखविण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात चौकशी होऊन त्याचा अहवाल जालना कार्यालयास प्राप्त झाला आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात वीज ग्राहकांकडून घेतलेला धनादेश आल्या नंतर संबंधित वीज ग्राहकाच्या वीजबिलातून ती रक्कम कमी करून तो धनादेश वीज वितरणच्या खात्यात जमा करण्या ऐवजी तो न वटल्याचे दाखविण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात चौकशी होऊन त्याचा अहवाल जालना कार्यालयास प्राप्त झाला आहे.त्यात यापूर्वीच उच्च स्तर लिपिक पंकज सरदेशपांडे आणि सहायक लेखापाल अडकिने यांना निलंबित केले होते. तर या प्रकरणात ज्या चार अधिकाऱ्यांकडे जालना विभागाचा पदभार होता, त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जालना येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात एक डिसेंबर २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१८ या काळात जवळपास १५० पेक्षा अधिक ग्राहकांच्या पावत्या फाडून धनादेश जमा करण्यात आल्याचे दर्शविले होते. मात्र ते वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा झाले नव्हते. हा नेमका घोटाळा की निष्काळजीपणा नेमका कसा झाला याची चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारीही चक्रावून गेले. केलेल्या चौकशीत त्यांनी पंकज सरदेशपांडे आणि सहायक लेखापाल मायानंद अडकिने तसेच अधीक्षक अभियंता कार्यालयातील लेखाधिकारी अतुल वडसकर यांच्यावर ठपका ठेवला आहे.एकूणच या प्रकरणी जालना शहर विभागाचे मुख्य अभियंता आर. एल. मोरे यांनी सांगितले की, नुकताच या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार वीज वितरण कंपनीचे जवळपास ८२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार ज्यांनी वीजबिल भरण्यासाठी धनादेश दिले होते. ती रक्कम काढून ती पुन्हा वीज वितरणच्या खात्यात वर्ग करून संबंधित ग्राहकांना दिलासा दिला आहे.एकूणच या प्रकरणात मी रूजू होण्यापूर्वी ज्या चार अधिकाºयाकडे पदभार होता, त्यांचीही चौकशी होणार आहे. एवढे सर्व होत असताना त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष कसे केले, या बद्दल त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.दरम्यान, जालन्यातील ५०२ वीज ग्राहकांनी २८२ धनादेश दिले होते. त्याची रक्कम ८२ लाख रूपये होते असेही मोरे यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही २० डिसेंबरलाच कदीम पोलीस ठाण्यात सरदेशपांडे आणि अडकिने यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दिला असल्याचेही मोरे यांनी सांगितले. ही रक्कम दंड आणि व्याजासह वर्ग केल्याचेही सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणfraudधोकेबाजी