शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:10 IST

पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने तोडून टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने तोडून टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली. ऐन भरात आलेली बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे उमेश संदीपान गव्हाणे यांची शेती आहे. गट क्र. १७८ मधील पाच एकर शेतीत त्यांनी मोसंबीची ७०० रोपे लावली होती. यंदाच्या भीषण दुष्काळातही गव्हाणे यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून सर्व रोपे जगविली होती. रोपांची चांगली वाढ झाल्याने बाग फुलून दिसत होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मोसंबीची रोपे तोडून टाकली.घटनेची माहिती प्राप्त होताच गोंदी पोलिसांना घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उमेश गव्हाणे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून आशपाक फतरु सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यंदा दुष्काळ असल्यामुळे गव्हाणे यांनी मोठ्या हिंमतीने या मोसंबीचे रोपटे जोपासली. यावर अमाप खर्च देखील केला होता. पण, एका रात्रीत मोसंबीच्या रोपट्यांचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे गव्हाणे हतबल झाले आहेत. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या मोसंबीच्या रोपांची जोपासना केली होती. तसेच मोसंबीवर त्यांनी केलेला अमाप खर्च देखील आता वाया गेल्याने पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.२० मार्चलासुद्धा गव्हाणे यांच्या शेतातील विद्युत केबल, मोटार, ठिबक आदी शेतीस आवश्यक साधनांची तोडफोड करण्यात झाली होती. याबाबत गुन्हाही दाखल झाला होता. याच वेळी पोलिसांनी तपास केला असता तर आज नुकसान टळले असते, अशी खंत हतबल झालेल्या गव्हाणे यांनी व्यक्त केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून एवढी मोठी झाडे तोडण्याचा त्या व्यक्तीचा नेमका उद्देश काय होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्र