शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:28 IST

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कआव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.आव्हाना येथे नामदेव राजाराम सरोदे यांचे शासनमान्य देशी दारूचे दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील जवळपास दीड लाख रूपये किमतीचे ८० देशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले. आव्हाना येथील घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.यापूर्वी ८ जून रोजी याच दुकानात चोरी करून चोरट्यांनी दारूचे १५ बॉक्स लंपास केले होते.या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.मात्र, या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच बुधवारी पहाटेच्या सुमारास दुसऱ्या वेळेस चोरट्यांनी या दुकानातील देशीदारूचे बॉक्स लंपास केले आहेत. याच दिवशी प्रमोद गावंडे यांचे पिंपळगाव रेणुकाई येथील दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.गावात दहशतएकच दुकान चोरट्यांनी दोन वेळेस फोडले आहे. चोरीच्या घटना वाढल्याने आव्हाना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.‘एक्सपायर’ बॉक्स जैसे-थेआव्हाना येथील देशी दारूच्या दुकानातून चोरट्यांनी ७० बॉक्स लंपास केले. मात्र, याचवेळी दुकानात ‘एक्सपायर’ झालेले बॉक्स होते. या बॉक्सला चोरट्यांनी हातही लावला नाही. त्यामुळे हे ‘एक्सपायर’ बॉक्स दुकानात ‘जैसे थे’ आले.औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील देशी दारूच्या दुकानांना लक्ष्य करणारी टोळीच सक्रिय असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात आले.पिंपळगाव, आव्हाना, अंधारी, भराडी आदी अनेक गावांत देशी दारूच्या दुकानात चोरी झाली आहे. त्यामुळे दुकान फोडणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी