शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोम्बिंग आॅपरेशनला चोरांचा ठेंगा ! ७ चोऱ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:46 IST

अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे शनिवारी रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे शनिवारी रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात रोख ७२ हजारासह एक दुचाकी, चांदीचे दागिने, मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, या परिसरात पोलिसांकडून वेळोवेळी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत आहे. परंतु, तरीही चो-यांचे सत्र थांबता थांबेना.लखमापुरी येथील अशोक गंगाधर तांदळे यांच्या घरी रात्री चोरट्याने कम्पाउंड मधील गेट उघडून प्रवेश केला. मात्र चॅनलगेटला लावलेले कुलुप टॉमीच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न फसल्याने चोरट्याने व्हराड्यातच लावलेली दुचाकी पळविली. तसेच रुस्तूम भापकर यांच्या घरामधील पेटीत ठेवलेले रोख १५ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. जवळच असलेल्या पाराजी पिसुळे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी घराची झाडाझडती घेऊन घरगुती वापरातील वस्तू, चांदीचे जोडवे, ५ साड्या लंपास केल्या.ऊसतोडीसाठी आलेल्या टोळीला देखील चोरट्यांनी लुटले. टोळी मुकादम रमेश बदु जाधव यांचे रोख २० हजार रुपये व एक फोन, विनायक फुलचंद जाधव यांच्या झोपडीतून २० हजार रुपये रोख, लक्ष्मण नीला जाधव यांच्या झोपडीतून ७ हजार रोख रक्कम, रायसल राठोड यांचे १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.चोरी झाल्याची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एच. व्ही. वारे, पोलीस कॉन्स्टेबल एन. एच. चव्हाण, अमर पोहार, ज्ञानेश्वर मराडे, योगेश दाभाडे यांनी पंचनामा केला. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.नागरिकांमध्येभीतीचे वातावरणमागील काही महिन्यापासून अंबड, शहगड, सुखापुरी, वडीगोंद्री या परिसरात मोठ्या प्रमाणात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलीस विभागाकडून कॉम्बिंग, पेट्रोलिंग करण्यात येत आहे. परंतु, तरीही चोºयांचे सत्र सुरुच आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी