शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात ५५ खून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:19 IST

मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात हाणामाऱ्या, चोºया, दरोड्यांचे सत्र सुरूच आहे. त्यात आता खुनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.या रक्तरंजित घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला नियंत्रित करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, खुनाच्या दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५१ प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित प्रकरणांमधील आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.उद्योगनगरी म्हणून जालन्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. जमिनीचे वाद, संपत्ती, पूर्ववैमनस्य, किरकोळ कारण, हेवे दावे, अनैतिक संबंध अशा अनेक कारणांवरून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. दगडाने ठेचून, शस्त्राचे वार करून निर्दयीपणे खून केले जात आहेत. वाढलेल्या हाणामाऱ्यांसह इतर घटनांना आळा घालण्यासाठीपोलीस प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.पोलिसांसमोर आव्हान : जून महिन्यात वाढ२०१८ या वर्षात जिल्ह््यात ४१ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३८ खुनाच्या घटनांचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तर २०१९ मध्ये मे महिन्यापर्यंत जिल्हाभरात १४ जणांचा खून झाला आहे. त्यापैकी १३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, जून महिन्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. चो-या, दरोड्यांसह खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरत असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस