शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:12 IST

खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : गुणवत्ता असतानाही होतकरू विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या प्रवेशाची १८ शनिवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.ग्रामीण भागातील गुणवंत हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाकडे जात नाही. परिणामी, गुणवंत गुणवत्ता असतांनाही उच्च शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेता यावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, यासाठी ज्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्याचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.त्यानुसार १८ मे रोजी प्रवेशपूर्व परिक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्याचे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी स्वत: विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व बैठक व्यवस्थेची पाहणी केली.३० विद्यार्थ्यांना मिळणार संधीयातून तीस विद्यार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यांची अकरावी व बारावीची सर्व तयारी मोफत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षक विचारवंत तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.४जालना जिल्ह्यात आयआयटीची तयारी करण्यासाठी क्लासेस नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यातच बाहेर गावी शिक्षणांसाठी लाखो रुपये खर्च येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असतांनाही त्यांना आयआयटीत प्रवेश घेता येत नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान