शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक विम्यासाठी ५ लाख ५८ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:29 IST

प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा दुष्काळ असल्यामुळे जिल्ह्यात रबीचा पेरा मोठ्या प्रमणात घटला असून ३ जानेवारीपर्यंत ४४ टक्केच रबीचा पेरा झाला आहे. मात्र, पेरलेल्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा या योजनेसाठी तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतकऱ्यांनी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कं. लि. कडे अर्ज दाखल केले आहेत.शेतक-यांसाठी खरीप व रबी पिके खूप महत्वाची असतात. यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा वर्षभर चालतो. पण, अनेकदा पिकांची पेरणी, झाल्यानंतर नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट आदी टाळता न येण्याजोग्या जोखमींवर पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांची हानी झाल्यास त्यांना सुरक्षा कवच मिळते, यासाठी गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी, करडई, सूर्यफूल, कांदा या पिकांसाठी आॅक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत प्रधानमंत्री पीकविमा या योजनेअंतर्गत कोरडवाहू व बागायत शेतक-यांकडून अर्ज घेण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार अशा एकूण तब्बल ५ लाख ५८ हजार ४१२ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्यावरच विम्याची मदतदुष्काळ, पावसातील खंड, पूर , क्षेत्र जलमय होणे, किंवा कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग वीज कोसळणे, गारपीट आदी कारणांमुळे पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देता येतो. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकºयांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास विमा मिळतो.नुकसान भरपाईचे दायित्वयोजनेच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. या योजनअंतर्गत एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ३. ५ पट किंवा एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ३५ टक्के यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी नुकसान भरपाई ही संबंधित विमा कंपनीतर्फे दिली जाईल. त्यापेक्षा जास्त येणारी नुकसान भरपाई ही केंद्र व राज्य शासनातर्फे ५० : ५० म्हणजेच समप्रमाणात दिली जाईल.मुदतीसाठी पात्रनुकसानीच्या अधिसूचनेअगोदर ज्या शेतक-यांनी विमाहप्ता रक्कम भरली आहे. किंवा त्यांच्या खात्यातून विमा रक्कम वजा करून घेण्यात आली आहे. असेच शेतकरी मदतीसाठी पात्र राहणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी