शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातून चोरीला गेलेल्या ४० पोते तुरीचा झाला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:32 IST

नवीन मोंढा भागातून ४० पोते तुरीची चोरी उलगडण्यास चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे.

जालना : नवीन मोंढा भागातून ४० पोते तुरीची चोरी उलगडण्यास चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ लाख २० हजाराची तुर जप्त करण्यात आली आहे. शेख रहीम शेख अब्दुल (ह.मू. नारेगाव,  मुळ रा. उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. 

सय्यद सादीक सय्यद नुर, ( रा, बाबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी  २० डिसेंबर रोजी चालकाला आयशर मधून अहमदनगर येथील गुरुदत्त ट्रान्सपोर्ट येथून पावती घेऊन शेवगा-पाथर्डी येथे जावून २०० पोत तुर ट्रकमध्ये भरुन जालना येथे पोहच करण्याचे सांगितले. परंतु, चालकाने माल वेळेत पोहच केला नाही. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता.  त्यानंतर फिर्यादीने जालना येथील नविन मोंढा भागात गाडीचा शोध घेतला असता, गाडी नवीन मोंढा गेट जवळ मिळाली.  यातील माल चेक केला असता, त्यामध्ये ४० पोते तुर कमी असल्याचे लक्षात आले. यावरुन सय्यद सादीक सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी चालकाबाबत फिर्यादीकडे विचारपुस केली असता, त्यांनी चालकास ७ ते ८ दिवसापूर्वीच एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत कामाला ठेवले होते.  या माहितीवरून त्याला कामाला लावलेल्या व्यक्तीला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली  असता, त्याने चालक हा औरंगाबाद येथील नारेगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालकास नारेगाव येथून ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४० पोते तुर जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, पोउपनि. प्रमोद बोंडले कर्मचारी नंदलाल ठाकूर, अनिल काळे यांनी केली.का केली चोरीचालक हा नवीन मोंढा भागात तुर घेवून गेला असता, त्याच्याकडून व्यापाऱ्यांनी माल विकत घेतला नाही. म्हणून त्यांने ४० पोते तुर मोंसबी मार्केट च्या बाजूला एका ठिकाणी भिंती लगत ठेवली होती. 

टॅग्स :theftचोरीJalanaजालनाPoliceपोलिस