शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

८० गावांमधील काम ३६ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:44 IST

मंठा शहरासह तालुका व परिसरातील ८० गावांमधील कायदा- व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम मंठा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंठा शहरासह तालुका व परिसरातील ८० गावांमधील कायदा- व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम मंठा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. अपुरे कर्मचारी असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना मोठी कसरत करावी लागत असून, आपत्तीच्या स्थितीत संबंधितांची मोठी धावपळ होत आहे.जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी मंठा ठाणे एक आहे. दक्षिणोत्तर ६५ किलोमीटर तर पूर्व- पश्चिम जवळपास ३७ किलोमीटरची हद्द या ठाण्यांतर्गत येते. पाच बीटमध्ये ८० गावांचा समावेश आहे. यात मंठा बीटमध्ये १३, ढोकसळ बीटमध्ये १३, खोराड सावंगी बीटमध्ये १४, पोटोदा बीटमध्ये १९ तर तळणी बीटमध्ये २१ अशी एकूण ८० गावे या ठाण्यांतर्गत येतात. राजकीय दृष्ट्या मंठ्यासह तळणी, पाटोदा ही गावे संवेदनशील आहेत.ठाण्याच्या हद्दीतून वाहणा-या पूर्णा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा, वाहतूक रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परभणी- औरंगाबाद, बुलडाणा महामार्ग ठाण्याच्या हद्दीतून जातात. महामार्गावर होणारे अपघात, जखमींना मदत करण्याचे कामही मंठा ठाण्यात कार्यरत अधिकारी कर्मचा-यांना करावे लागते. शिवाय मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचे दौरे, बैठकांचा बंदोबस्तही आहे. सध्या मंठा ठाण्यात तीन अधिकारी आणि ३६ कर्मचारी कार्यरत आहेत. पैकी दररोज पाच कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असतात. तर शिल्लक ३१ पैकी चालक, बीट, स्टेशन डायरी, कोर्ट, तहसील, समन्स, वॉरंट बजावणीसह इतर कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे कर्मचारी वेगळेच! ही स्थिती पाहता ठाण्यात शिल्लक कर्मचारी राहणे मुश्किल असते. अशा स्थितीत एखाद्या गावात हाणामारी झाली, अपघात झाला किंवा आपत्ती जनक स्थिती निर्माण झाली तर कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना धावपळ करावी लागते. या कामाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावरही होताना दिसतो. ठाण्याच्या हद्दीतील गावे आणि कर्मचाºयांची संख्या पाहता मंठा ठाण्यातील कर्मचा-यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे