शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांविरूध्द १०० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:33 IST

चालू महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरूध्द १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गांधी सप्ताह व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली आहे. चालू महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरूध्द १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तब्बल ६ लाख ७२ हजार ६६२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई मोहीम राबविली. अवैध मद्य विक्री व हातभट्टी निर्मिती केंद्रावर धाडी टाकून १०० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.यात ७१ वारस व २९ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ९६२६ लिटर रसायन, ८२३ लिटर गावठी दारू (हातभट्टी), ३९८.४८ लिटर देशी दारू, ३५.२ लिटर विदेशी दारू असा एकूण १०८८५.६८ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ७० आरोपींना अटक करण्यात आली असून सोबत ७ वाहने जप्त करण्यात आले आहेत.कारवाईत एकूण एकूण ६ लाख ७२ हजार ६६२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अवैध दारूविक्री : ५ दुकानांवर निलंबनाची कारवाईनियमांचे उल्लंघन करून दारूची विक्री केल्याचा प्रकार पथकाच्या तपासणीत समोर आला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पाच दुकानांवर ३० दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांचा ‘ड्राय-डे’जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत व २४ आॅक्टोबर रोजी ‘ड्राय-डे’ पाळण्यात येणार आहे.या कालावधीत अवैध दारूविक्री करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.वाहनांची तपासणीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची विविध पथके वाहनांची तपासणी करीत आहेत. तसेच पार्सल सुविधा देणाºया विविध संशयितांवरही कारवाईची मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Code of conductआचारसंहिताPoliceपोलिस