शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

२५० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:54 IST

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पार पडली. मंजूर निधी खर्च न करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य नागरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक समाधान पवार, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.वार्षिक योजनेतून सर्वसाधारण घटकांसाठी १७५ कोटी ९० लक्ष रुपयांपैकी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी ६८ कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी २६ कोटी ३८ लाख, नैसर्गिक आपत्ती आणि टंचाईसाठी १७ कोटी ६० लक्ष, नाविन्यपूर्ण योजनेसाठी ८ कोटी ९४ लाख तर जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी ५४ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये गाभाक्षेत्रासाठी ११६ कोटी रुपये तर बिगर गाभाक्षेत्रासाठी १६ कोटी ९४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्यावर्षी २७७ कोटी ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या २०९ कोटी रुपयांपैकी ८३ कोटी ४० लाख यंत्रणांना देण्यात आलेल्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ७६ कोटी ४० लाख रुपये विविध यंत्रणांनी विकासकामांवर खर्च केले असल्याचे सांगत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा साठी शासनामार्फत देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांची असल्याचे लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले.दरवर्षी जिल्ह्यात साडेचार हजार विहिरींचे उद्दिष्टशासनाने जालना जिल्ह्यात दरवर्षी साडेचार हजार सिंचन विहिरी उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते. गेल्या काळात केवळ दोन हजार विहिरी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करुन जिल्ह्यासाठी १८ हजार सिंचन विहिरी मंजूर करुन घेतल्या आहेत. अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गतकाळात या विहिरी होऊ न शकल्याची खंत व्यक्त करत आॅनलाइन मस्टर भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, गटविकास अधिका-यांनीही यात वैयक्तिक लक्ष घालून या सिंचन विहिरी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामात दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.अवैधरीत्या वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणा-याविरूध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अवैध वाळूचा उपसा आणि त्याची वाहतूक करणा-यांवर पोलीसांसह महसूलने वचक ठेवावा. नसता, संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही यावेळी जिल्हाधिका-यांना दिले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर