शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या हातपंपांचे भाग्य कधी उजळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:46 IST

शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छता अभियानातून या हातपंपांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरात बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने ते नगरपालिकेचा नळ घेऊ शकत नाही. अशा नागरिकांसाठी प्रशासनाकडून हातपंपांची सुविधा करण्यात आलेली आहे. तर ज्या भागात अद्याप नगरपालिकेचे नळ कनेक्शन पोहोचलेले नाही. अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात हातपंपांची सुविधा केलेली असते. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करुनच हातपंप बसविण्याचानिर्णय घेण्यात येतो. नगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास २०० ठिकाणी हातपंप बसविले आहे. परंतु, शहरातील हातपंप पाण्याअभावी कोरडे, तर कुठे वापराविना खराब झाल्याने भंगार पडले आहेत.तर बोटावर मोजण्या इतके हातपंप सुरु आहेत.शहरातील रस्ते काम होताना हातपंप जमिनीत पूर्णपणे खाली गेले आहेत. तर काहीचे साहित्य चोरीला देखील गेले आहेत. मात्र. नगरपालिका प्रशासन यावर कोणतेही पाऊल उचलत नाही. हातपंपातून पाणी उपलब्ध झाल्यास टंचाईवर मात करता येऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषद