शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी आले २ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:15 IST

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड आणि शाळांची उदासिनता आदी  कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.

जालना : आरटीई अंतर्गत उपलब्ध ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी २२ मार्च ही अतिंम तारीख असून, पालकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 

आर्थिक दुर्बल घटक आणि मागास बालकांना अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअल्पसहाय्य  शाळांमध्ये मोफत  शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून २१६ शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही प्रक्रिया तांत्रिक बिघाड आणि शाळांची उदासिनता आदी  कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.

मागील काही वर्षांपासून शिक्षण संचालक विभागाने आरटीई प्रवेशाचे नियम कडक करून प्रवेशासाठी पालक राहत असलेल्या जागांचे अंतर आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे भाडेपट्टीची अट ठेवल्याने बनावट पध्दतीने प्रवेश मिळविणा-यांना चाप बसला असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.  त्यामुळे उपलब्ध जागांपैकी  दरवर्षी अनेक जागा रिक्त राहत आहेत.  यावर्षी १६ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३ हजार ८३५ जागांसाठी जिल्ह्यातून २ हजार ४०२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी २२ मार्चपर्यंत अतिंम तारीख असून, १ हजार ४३२ जागा रक्त राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीEducationशिक्षण