शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:29 IST

अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अनिकेत विक्रम तराळ (१७), योगेश कोंडीबा तराळ (२१) असे मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील प्रमुख नद्यांची चाळणी झाली आहे. याकडे महसूल प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. शनिवारी २३ मार्च रोजी अशाच प्रकारे ट्रॅक्टर घेऊन वाळूचा उपसा करण्यासाठी मयत रात्री ९ वाजेच्या दरम्यान भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावच्या लगत असलेल्या केळणा नदीच्या पात्रातून ट्रॅक्ट्ररमध्ये वाळू भरण्यासाठी गेले होते. पात्रातील वाळूच्या खड्यात अनिकेत विक्रम तराळ व योगेश कोंडीबा तराळ हे दोघे खड्ड्यातून वाळू भरून वर देत होते. तर उभे असलेले त्यांचे साथीदार वाळूने भरलेले टोपले ट्रॅक्ट्ररमध्ये टाकण्याचे काम करीत होते. ट्रॅक्टर भरत असतानाच पात्रातील खड्डयावरील बाजू अचानक कोसळल्याने अनिकेत तराळ व योगेश तराळ हे दोघे चुलत भाऊ खड्ड्यात दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खड्ड्याच्यावर असलेल्या त्यांच्या तीन साथीदारांनी घाबरुन नदीपात्रातून घराकडे धूम ठोकली. घडलेल्या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने नदीपात्रात जाऊन वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तराळ बंधूना बाहेर काढले, ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसाठ, कर्मचारी नागरगोजे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेची भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.नदीपात्र : कपारे ठरताहेत मजुरांसाठी कर्दनकाळतालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्री वाळूची तस्करी करण्यात येत आहे. यामुळे केळणा, गिरजा, पूर्णा या नदीपात्रात मोठे कपारे पडले आहेत. या कपा-याच्या आत चांगल्या दर्जाची वाळू मिळत असल्याच्या हव्यासापोटी वाळू माफिया रात्रं - दिवस मजुरांच्या माध्यमातून उपसा करत आहेत. त्यामुळे कपार कोसळण्याची भीती अधिक असते. गेल्या वर्षी देखील कोदोली शिवारात केळणा नदीच्या पात्रात अशाच प्रकारे एका मजुराचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी मजुरांना जास्तीचा मोबदला मिळतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून अनेक मजूर काम करतात. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Deathमृत्यूsandवाळूSmugglingतस्करी