शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२० कोटींची बिले ३ मिनिटात मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:52 IST

गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली.ही विशेष सभा मध्यंतरी औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळे होऊ शकली नाही. आणि आता पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. ही बाब लक्षात घेता तातडीने विशेष सभा सोमवारी घेण्यात आली.जालना पालिकेची विशेष सभा सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह विषय समित्यांचे सभापती तसेच मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी गेल्या आर्थिक वर्षात रस्ते, देखभाल दुरूस्ती यासह विविध कामांची जवळपास २० कोटी रूपयांपेक्षा अधिकची देयके मंजुरीविना रखडली होती. या बिलांना मंजुरी देताना सभागृहात कोणत्याही नगरसेवकाने आक्षेप न घेता मंजूर- मंजूरच्या घोषणेत मान्यता देण्यात आली.गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. असे असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे, बंद पथदिवे आणि स्वच्छतेचा मुद्दा सभागृहात गाजला. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले, भाजपचे गटनेते अशोक पांगरकर, भास्कर दानवे यांच्यासह महिलांनी आपापल्या प्रभागातील प्रश्न मांडले. बहुतांश ठिकाणी पथदिव्यांचा मुद्दा गाजला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मध्यस्थी करून गणेश विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्ग, पथदिवे सुरू करण्याचे निर्देश दिले.जलवाहिनीच्या मुद्यावर चर्चासभागृहामध्ये अंतर्गत जलवाहिनीचा मुद्दा देखील पुन्हा चर्चिला गेला. शहर तसेच आसपास मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक नगरसेवकांनी सांगितले. मुख्याधिकारी नार्वेकर यांनी यामध्ये लक्ष घालून गळतीचे कारण शोधले जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षcivic issueनागरी समस्याbillबिल