राजेंद्र शिंदे यांची जालना तालुक्यातील भातखेडा शिवारात शेती आहे. गट क्र. ०८ मधील पत्राच्या शेडमध्ये त्यांनी १४ शेळ्या व एक बोकड बांधले होते. गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी पत्राच्या शेडमधून शेळ्या चोरून नेल्या. शुक्रवारी सकाळी राजेंद्र शिंदे हे शेतात आले असता, त्यांना शेळ्या चोरीस गेल्याचे समजले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी राजेंद्र एकनाथ शिंदे (४४, रा. वंजार उम्रद ता. जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोहेकॉ. चव्हाण हे करीत आहे. दरम्यान, जालना तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे शेतकºयांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भातखेडा शिवारातून १५ शेळ्या चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST