शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:45 IST

हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले.राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी हैदराबाद येथून बुलडाण्याकडे मंठामार्गे एका आयशर वाहनातून जात असल्याची माहिती मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी कर्मचाºयांसह मंठा- जिंतूर मार्गावरील हॉटेल दर्शनाजवळ सापळा रचला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिंतूरकडून येणारे आयशर वाहन (क्र. टीएन-०७, युएच- १३८४) येताच पोलिसांनी पकडले. यावेळी चालक शैलेशकुमार यादव यास ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा पोत्यामध्ये पॅकिंग केलेला आढळून आला. सुमारे १४ लाख रुपयांचा गुटखा आणि १० लाखांचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी रात्री उशिरा मंठ्यात दाखल झाले असून, त्यांची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोउपनि. नितीन गट्टेवार, कर्मचारी शाम गायके, खलसे, काळे, आढे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस