लसीपासून वंचित असलेले ४५ वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घेणे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील त्रिसूत्रीचा वापर करावा, मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे.
तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
-*