शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा; ११ एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:59 IST

अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शनिवारी दुपारी वीज तारांचे शॉर्ट सर्किट होवून उसाला आग लागली. यात शहागड येथील तीन शेतकऱ्यांचा ११ एक्कर ऊस जळाला

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शनिवारी दुपारी वीज तारांचे शॉर्ट सर्किट होवून उसाला आग लागली. यात शहागड येथील तीन शेतकऱ्यांचा ११ एक्कर ऊस जळाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ११ के. व्ही. च्या उच्च दाबाच्या तारांचे घर्षण होवून ही आग लागली असल्याची माहिती शेतक-यांनी दिली आहे.बाबासाहेब भोसले यांची शहागड शिवारात गट क्र. ५९ मधिल साडेपाच एक्कर ऊस, रमेश भोसले यांचा एक हेक्टर तसेच कुसूम भोसले (सर्व रा. शहागड) यांचा साडेतीन एकर असा एकूण ११ एक्कर मधिल ऊस या आगीत खाक झाला आहे.आग लागल्याचे शेतक-यांच्या लक्षात येताच त्यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळात अग्निशाम दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामुळे ही आग आटोक्यात आली अन्यथा शेजा-यांच्या उसाला आग लागून मोठी घटना घडली असती.उसामधील विजेच्या तारेची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणला कल्पना दिली होती. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने ही आग लागली असल्याचे नागरिकांचे मत आहे. एक तर यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतक-यांनी कसा- बसा ऊस जगविला होता.आगीच्या घटना वाढल्या : कारखान्याने ऊस तोडण्याची मागणीयेथील परिसरात मोठ्या प्रमणात ऊस असून गेल्या काही दिवसांपासून येथे आगीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे तातडीने कारखान्याने ऊस नेण्याची मागणी होत आहे.येथील परिसरात वीज तारा खाली आल्या आहेत. यामुळे महावितरणने वीज तारांची दुरूस्ती करण्याची मागणी शेतक-यांनी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र