शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणारे २५ हजार ६४६ चालक कारवाईच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:22 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ हजार ६४६ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने चालू वर्षात कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकांकडून ५४ लाख ५१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाहतूक : कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

जालना : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ हजार ६४६ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने चालू वर्षात कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकांकडून ५४ लाख ५१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेने नियम मोडणाºया चालकांवर कारवाई केली असली तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकारी, कर्मचारी विविध ठिकाणी थांबून वाहतुकीवर नियंत्रण ठेवतात. या दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कारवाई करून दंडही आकारला जातो. चालू वर्षात एकूण २४ हजार ६४६ चालकांवर कारवाई करून ५४ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यात जानेवारी महिन्यात १५२६ चालकांवर कारवाई करून ३ लाख ५८ हजार ३०० रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात १४०९ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून ३ लाख १७ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मार्च महिन्यात २१०१ चालकांवर कारवाई करून ४ लाख ८८ हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. एप्रिल महिन्यात १०१२ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर २ लाख १६ हजार ९०० रूपयांचा दंड लावण्यात आला. मे महिन्यात १७०५ चालकांवर कारवाई करून ३ लाख ५८ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. जून महिन्यात २८३५ चालकांवर कारवाई करण्यात आली. तर संबंधित चालकांवर ६ लाख १० हजार ४०० रुपयांचा दंड लावण्यात आला. जुलै महिन्यात २०१२ चालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर ४ लाख ३५ हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. आॅगस्ट मध्ये २२८२ चालकांवर कारवाई करून ५ लाख २० हजार ७०० रूपयांचा दंड ठोकण्यात आला. सप्टेंबरमध्ये १६९३ चालकांवर कारवाई झाली. तर त्यांना ३ लाख ७३ हजार ४०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात ५६६ चालकांवर कारवाई करून १ लाख २८ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. नोव्हेंबर मध्ये ४१३५ चालकांवर कारवाई करून ९ लाख ७ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखा नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाई करीत असली तरी नियम धाब्यावर बसविणाºया चालकांची संख्याही कायम आहे. त्यामुळे शहर वाहतूक विस्कळीतच दिसून येते.

टॅग्स :Jalanaजालनाtraffic policeवाहतूक पोलीस