शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

By दिपक ढोले  | Updated: December 5, 2023 18:50 IST

१ डिसेंबरला झाली होती जालना येथे सभा; जरांगे पाटलांच्या सभेतून एक कोटींचा मुद्देमाल लंपास

जालना : शहरात १ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा व रॅली झाली. या रॅलीसह सभेला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चैन, मोबाइलसह पॉकेट, पर्स, रोख रक्कम लंपास केली आहे. चोरट्यांनी ५० सोन्याच्या चैन, रोख रक्कम, ९० मोबाइल, दुचाकी वाहने असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यातील बहुतांश चोरटे व्हिडीओमध्येही दिसत असून, त्यांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजबांधवांच्या वतीने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या अनुषंगानेच १ डिसेंबर रोजी जालना शहरात रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसह रॅलीला समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांची गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम, खिशातील पॉकीट, मोबाइल, पर्स चोरून नेले आहे. काही ठिकाणी चोरटे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. त्याचे व्हिडीओही पोलिसांकडे देण्यात आले आहे. याबाबतच्या तक्रारी आयोजकांकडे आल्या आहेत. यातील आरोपींचा शोध लावण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.

यांनी केल्या तक्रारीरॅलीसह सभेतून वैभव गाजरे, गणेश शिंदे, निवृत्ती शिंदे, रवी राऊत, आकाश राऊत, अजय अग्रवाल, शुभम खडके, विकास दानवे, दिनेश पुंड, महेश भालेकर, गोरख थोरात, अर्जुन वाघ आदींनी आयोजकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर आयोजिकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

गर्दीचा फायदा घेऊन चोरीमनोज जरांगे पाटील यांची १ डिसेंबर रोजी शहरात रॅली व सभा झाली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चैन, मोबाइल, पॉकीट, पर्स चोरून नेल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. याबाबत गुन्हे दाखल केले जाणार आहे. पोलिस ठाण्याला पथक नेमवून चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले.-शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील