शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

S. Jaishankar : "... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही," एस. जयशंकर यांनी अमेरिकेला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:56 IST

रशियासोबतच्या मैत्रिवरही केलं भाष्य.

वॉशिंग्टन : अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे संबंध अमेरिकेच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधांचा ना पाकला लाभ झाला ना अमेरिकेला, असे ते म्हणाले. 

ते येथे भारतीय-अमेरिकी नागरिकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी अमेरिकेने एफ-१६ लढाऊ विमानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पाकला पॅकेज दिल्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. पाकला पॅकेज दिल्यावरून भारतात अमेरिकेवर टीका झाली होती. तेव्हा पाकला आर्थिक साहाय्य केले नसून, एफ-१६ विमानांच्या सुट्या भागांची विक्री केली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे करण्यात आले, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले होते.

त्यावर जयशंकर म्हणाले की, दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे केले, असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही. एफ-१६ विमाने कुठे तैनात केली जाऊ शकतात आणि ती किती विध्वंस घडवून आणू शकतात, हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काही लोक पक्षपाती असतात. त्यांची भारतात सरशी होत नाही. ते देशाच्या बाहेर जिंकण्याचा प्रयत्न करतात.

पक्षपाती वार्तांकनाबद्दल अमेरिकी माध्यम घराण्यांवर टीकामी माध्यमांत येणारी वृत्ते वाचतो. काही वृत्तपत्रे काय लिहिणार आहेत हे तुम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक असते. येथेही असे एक वृत्तपत्र आहे, असे जयशंकर म्हणाले. तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी टाळ्या वाजवून जयशंकर यांच्या विधानाचे समर्थन केले.

...म्हणून रशियाशी मैत्री रशियाच्या सैन्य उपकरणांवर भारताचे अवलंबित्व आणि रशियासोबत मजबूत संबंध असण्याचे हे कारण नाही की, भारताने ही उपकरणे मिळविण्यासाठी अमेरिकेशी संपर्क केला नाही, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, १९६५ पासून जवळपास ४० वर्षांपर्यंत भारतात अमेरिकेचे कोणतेही सैन्य उपकरणे आली नाहीत. याच काळात भारत- सोव्हिएत, भारत - रशिया संबंध मजबूत झाले. ते म्हणाले की, टाळी दोन्ही हातांनी वाजते. असे नाही की, सर्व समस्या अमेरिकेकडून होत्या. मला वाटते आज हे संबंध वेगळ्या स्तरावर आहेत. अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान