शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवमध्ये योगादिनी मोठा गोंधळ; इस्लामिक कट्टरवाद्यांचा योगा करणाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:02 IST

मालदीवची राजधानी माले येथे योगादिनाचा कार्यक्रम सुरू होता, यावेळी हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

माले: आज जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय 'योग दिवस' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मालदीवची राजधानी माले येथील गलोल्हू नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इस्लामिक कट्टरवाद्यांच्या एका गटाने स्टेडियमवर हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

साहित्याची तोडफोडकार्यक्रमादरम्यान अचानक 100 हून अधिक लोक ध्वज घेऊन स्टेडियममध्ये धावत आले आणि त्यांनी लोकांना हुसकावून लावले. यावेळी कट्टरपंथीयांनी स्टेडियममध्ये लावण्यात आलेले योगाशी संबंधित पोस्टर-बॅनर्स आणि फलकांची मोडतोड केली. एवढेच नाही तर कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करणाऱ्या लोकांवरही या लोकांनी हल्ला केला. कट्टरवाद्यांनी हातात काही फलक आणि पोस्टर्स घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावर योगाच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यावर इंग्रजीत लिहिले होते- 'योग म्हणजे शिर्क' म्हणजेच 'इस्लाममध्ये योग करणे पाप आहे'.

आतापर्यंत 6 जणांना अटक याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले- मालदीव पोलिसांनी सकाळी गलोल्हू स्टेडियमवर घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही गंभीर बाब असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. इंडियन कल्चर सेंटरने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला उच्चस्तरीय अधिकारी आणि अनेक सरकारी अधिकारीही उपस्थित होते. मंगळवारी सकाळी कार्यक्रम सुरू होताच कट्टरवाद्यांनी हल्ला केला. यापूर्वीही कार्यक्रम बंद करण्याच्या धमक्या आल्या होत्या. 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेMaldivesमालदीव