शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
5
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
6
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
7
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
8
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
9
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
10
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
11
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
13
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
14
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
15
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
16
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
17
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
18
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
19
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
20
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त

होय, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचाच हात

By admin | Updated: June 8, 2016 04:41 IST

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले

हाँगकाँग : मुंबईत २६ नोव्हेंबर २00८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला अतिरेकी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्र संघात खोडा घालणाऱ्या चीनची भूमिका आता बदलताना दिसत आहे. कारण, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे जाहीर मत प्रथमच चीनने व्यक्त केले आहे. चीनच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, चीनने उघडपणे अशी भूमिका का घेतली असावी, याची चर्चा पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये लगेचच सुरू झाली आहे. मुंबईवर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेल्या या भयंकर हल्ल्यात १६४ जण ठार झाले होते, तर ३०८ जण जखमी झाले होते. चीनमधील टेलिव्हिजन सीसीटीव्ही ९ ने काही दिवसांपूर्वीच एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाची काय भूमिका होती, याबाबत त्यात माहिती दिली आहे. अमेरिकेसह अनेक देश पाकमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे व त्यांना तेथील लष्कर तसेच आयएसआय या गुप्तचर संघटनेची असलेली मदत याबद्दल उघडपणे टीका करीत असताना चीनने मात्र कायमच पाकच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

>चीनने दाखविले हल्ल्याचे फूटेज

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता याला पुष्टी देणारी काही दृश्ये चीनच्या एका टेलिव्हिजनने दाखविली आहेत. यात अजमल कसाब दिसत असून, या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाला जबाबदार ठरविले आहे. गत महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे चीन दौऱ्यावर गेले होते. याच दरम्यान येथील शांघाई टेलिव्हिजनने ही माहिती प्रसारित केली होती. लष्कर-ए-तोयबाने मुंबई हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केली हे यात दाखविण्यात आले आहे. शिनजियांंगमधील मुस्लीमबहुल भागात इस्लामिक मूव्हमेंटच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानात दुर्गम भागात प्रशिक्षण घेतले होते.

>वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका 

ही चित्रफीत पाहिलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाला किती महत्त्व आहे ते आम्ही पाहत आहोत. सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचचीच भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. जकी उर रहमान लखवी याच्यावर बंदी आणण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जेव्हा प्रयत्न केले तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता, पठाणकोट हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर याच्यावर कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नालाही चीनने खोडा घातला होता.