शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 23:52 IST

Xi Jinping visit Dalai Lama's Home:तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे.

ल्हासा : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनल्यानंतर पहिल्यांदाच तिबेटचा दौरा केला आहे. या वेळी जिनपिंग यांनी तिबेटची राजधानी ल्हासाच्या डेपुंग मठ, बरखोर स्ट्रीय आणि पोटाला पॅलेससारख्या प्रसिद्ध बौद्ध मठांना भेट दिली. पोटाला पॅलेस हे बौद्ध धर्माचे महागुरु दलाई लामा यांचे घर म्हटले जाते. शी जिनपिंग यांचा दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे. (Xi Jinping has made his first visit to Tibet as Chinese president to Potala Palace.)

तिबेटमध्ये पुढील दलाई लामांची निवड केली जाणार आहे. जिनपिंग यांचा तिबेट दौरा अचानक ठरविण्यात आला आहे. काही वर्षांपासून चीनचे बौद्ध मठांवर नियंत्रण वाढले आहे. शाळांमध्ये तिबेटी भाषेऐवजी चीनची मंडारिन भाषा शिकविली जात आहे. तसेच चिनी सरकाच्या नितींचा विरोध करणाऱ्या किंवा विरोधात बोलणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात आहे. दलाई लामांशी देखील संबंध असल्याचे समजले तरी देखील त्याला कठोर शिक्षा केली जात आहे. 

तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे. यासाठी चीन आता पंचेन लामा यांना आपला मोहरा बनवत आहे. (Xi arrived in the regional capital Lhasa on Thursday, the official Xinhua News Agency said on social media.)

कोण आहेत पंचेन लामादलाई लामा यांच्यानंतर तिबेटच्या बौद्ध धर्मात दुसरे म्हहत्वाचे व्यक्ती म्हणून पंचेन लामा यांचे स्थान आहे. त्यांचे पद देखील दलाई लामांसारखए पुनर्जन्माच्या सिद्धांतावर आधारित आहे. 26 वर्षांपूर्वी चीनने त्यांचे अपहरण केले होते. तेव्हा त्यांचे वय ६ वर्षे होते. ते आता 32 वर्षांचे झाले आहेत. चीन त्यांना दलाई लामांच्या जागी आणण्याचा प्रयत्न करत आहे. 

नव्या दलाई लामांची निवड का?तेनजिन ग्यात्सो, हे नाव आपण ओळखत असलेल्या दलाई लामांचे आहे. त्यांचे वय 86 वर्षे आहे. त्यांची प्रकृतीही ठीक नसते. यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यावरून तिबेटमध्ये हालचाली सुरु आहेत. तिबेटमध्ये दलाई लामा म्हणजे एक जिवंत बुद्ध मानले जाते, जे मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतात. हा नवा धर्मगुरु चीनला निवडायचा आहे.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन