WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 04:36 PM2022-04-03T16:36:56+5:302022-04-03T16:41:46+5:30

WWE Undertaker: दोन वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा केलेल्या WWE सुपरस्टार अंडरटेकरचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे.

WWE Undertaker: The Undertaker emotional speech in the Hall of Fame 2022 | WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक

WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक

googlenewsNext

WWE Undertaker: आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी किंवा आताही WWE हा शो पाहिला असेल. या शोमधील अनेकजण खूप लोकप्रिय झाले. पण, यात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली 'द अंडरटेकर'(Undertaker)ने. भारतातही 'अंडरटेकर'चा मोठा चाहतावर्ग आहे. दोन वर्षांपूर्वी अंडरटेकरने WWE मधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण काल म्हणजेच शनिवारी अंडरटेकरला 'हॉल ऑफ फेम'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी भाषण देताना अंडरटेकर खूप भावूक झालेला पाहायला मिळाला.

सर्वांकडून स्टँडिंग ओव्हेशन...
नुकतीच WWE रेसलमेनिया 38 ला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात अंडरटेकरचा 2022च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी त्याने रिंगमधून निवृत्ती घेतली होती. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यानंतर WWE चे अध्यक्ष विन्स मॅकमोहन आणि इतर सर्वांनी अंडरटेकरला स्टँडिंग ओव्हेशन दिले.

भाषणात अंडरटेकर भावूक
आपल्या भाषणा अंडरटेकर म्हणाला की, गेल्या 30 वर्षांपासून मला वेगवेगळ्या ओळखी मिळाल्या. कधी अंडरटेकर, कधी डेडमॅन, फेनोम आणि अमेरिकन बॅडस. पण आज मला तुम्हाला 30 वर्षे मागे घेऊन जायचे आहे. एक सामान्य मार्क कॅलवेला तुम्ही अंडरटेकर म्हणून प्रेम केले होते. तो पुढे म्हणाला की, अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्या पाठिशी राहिलात, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आपल्या भाषणचा शेवट त्याने "Never say never," या वाक्याने केला.

अंडरटेकरची कारकीर्द
24 मार्च 1965 रोजी जन्मलेल्या मार्क कॅलवे उर्फ ​​द अंडरटेकरने WWE च्या जगावर तीन दशके राज्य केले. भारतातही अंडरटेकरच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अंडरटेकर हा इतिहासातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये गणला जातो. आपल्या कारकिर्दीत अंडरटेकरने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवला. यादरम्यान त्याने रेसल मेनियासह इतर महत्वाचे टायटल्स आपल्या नावे केली आहेत.

Web Title: WWE Undertaker: The Undertaker emotional speech in the Hall of Fame 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.