शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

तुमचं लॉन विद्रूप आहे का?- हे घ्या बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 07:47 IST

ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे नावाच्या महिलेच्या घरासमोरच्या लॉनला जगातील सगळ्यात विद्रूप लॉन असं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

जगात अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यात अनेक लोक हिरिरीने भागही घेत असतात. खेळाची , अभ्यासातील एखाद्या विषयाची , कलेच्या सादरीकरणाची, शरीरसौष्ठवाची, जोरात गाडी चालवण्याची, पाककला स्पर्धा असते.  या सगळ्या स्पर्धा  सगळ्यात उत्तम जे काही असेल ते शोधण्यासाठी असतात. सगळ्यात चांगलं, दर्जेदार असं जे काही असेल त्याला सामान्यतः बक्षीस दिलं जातं. मात्र, जे काही सर्वोत्तम असेल त्याला बक्षीस या स्पर्धेच्या मूलभूत विचारातच वेगळा विचार करणारेही काही लोक जगात असतात. ते अशाही स्पर्धा भरवतात ज्यात ‘सगळ्यात वाईट असेल त्याला’ पारितोषिक दिलं जातं.

अशीच एक स्पर्धा नुकतीच जगभरात घेतली ती म्हणजे, ‘वर्ल्ड्स अगलीएस्ट लॉन.’ म्हणजेच जगातील सगळ्यात विद्रूप दिसणारं लॉन.   त्या स्पर्धेसाठी अत्यंत घाणेरडी दिसणारी, जराही काळजी न घेतल्यामुळे सुकलेली अनेक लॉन्स परीक्षकांनी बघितली आणि त्यातील सगळ्यात विद्रूप लॉनला बक्षीसदेखील जाहीर केलं. ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे नावाच्या महिलेच्या घरासमोरच्या लॉनला जगातील सगळ्यात विद्रूप लॉन असं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

अशी ही जगावेगळी स्पर्धा घेणारे लोक आहेत तरी कोण? तर  स्वीडन या देशातील गॉटलँड नावाच्या शहराच्या महानगरपालिकेने ही स्पर्धा घेतलेली आहे. खरं म्हणजे स्वीडन हा युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेला अत्यंत सुंदर देश आहे. विकासाच्या सगळ्या निकषांमध्ये जगात कायम पहिल्या दहात जागा मिळवणाऱ्या या देशात भरपूर बर्फवृष्टी होते आणि त्यांच्याकडे  पाण्याची काही कमतरता नाही. शिवाय स्वीडनची लोकवस्तीदेखील अतिशय विरळ आहे. त्यामुळे एकमेकांपासून अंतर राखून बांधलेले सुंदर बंगले आणि अवतीभोवती  देखणी लॉन्स हे स्वीडनमधील कॉमन दृश्य आहे. तरीही गॉटलँड शहराने अशी स्पर्धा का घेतली ? 

तर या शहरात मागे अतिशय तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला. त्याची दाहकता इतकी होती की, सगळ्या शहराला त्याची झळ लागली. त्यावेळी पाणी कपात करण्याच्या विविध मार्गांचा विचार सुरू झाला. त्यात असं लक्षात आलं की, चांगलं लॉन बनवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी खूप पाणी लागतं. पाणीटंचाईच्या काळात लॉनसाठी वापरलं जाणारं पाणी हा पाण्याचा सरळ सरळ अपव्यय ठरतो. त्यावेळी लोकांनी पाणी वाचवावं, यासाठी या महानगरपालिकेने असं जाहीर केलं की, ज्याचं लॉन सगळ्यात घाणेरडं असेल त्याला विशेष बक्षीस देण्यात येईल. कारण, घाणेरडं लॉन म्हणजे निगा न राखलेलं लॉन म्हणजेच त्यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी केलेला असणार. यात स्पर्धेचा आणि बक्षिसांचा भाग अर्थातच फार किरकोळ होता; पण अशी विचित्र स्पर्धा आयोजित केल्यामुळे खूप लोकांचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि पाणी वाचवण्याचा संदेश खूप लोकांपर्यंत पोहोचला. 

मागच्या वर्षी शहरापुरती मर्यादित असलेली ही स्पर्धा यावर्षी गॉटलँड शहराने  आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केली, कारण पाणी वाचवण्याचा संदेश आज जगात सगळीकडे देणं महत्त्वाचं आहे.  या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणाऱ्या मुरे या बाई आणि त्यांची चार टीनएजर मुलं त्यांच्या घरात राहतात. त्यांच्याकडे पावसात पडणारं पाणी साचवून ठेवतात आणि  सांभाळून वापरतात. उन्हाळ्यात त्यांच्याकडचं पाणी संपलं तर  पाणी घेऊन येणाऱ्या टँकरची दोन-दोन आठवडे वाट बघावी लागते. त्यामुळे लॉनला नियमित आणि भरपूर पाणी देणं, हे त्यांना मुळातच शक्य नाही. त्यात त्यांच्या जागेत बँडीकूट जातीच्या घुशींचा उपद्रव खूप आहे. गवत लावून ते वाढवण्याच्या प्रयत्न केला जरी, तरी या घुशी जमिनीत बिळं करून  गवत खराब करून टाकतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुरे यांना जगातील सगळ्यात विद्रूप लॉनचा किताब मिळाला. - गॉटलँड महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार २०२३ सालच्या स्पर्धेमुळे त्यांच्या बेटावरच्या पाण्याच्या वापरात एकूण पाच टक्क्यांची घट दिसून आली.

कॅथलीन मुरे यांचं बक्षीसवाईटातलं वाईट लॉन शोधण्याच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे यांना बक्षीस म्हणून काय मिळालं? - गोटलँडस अगलीएस्ट लॉन २०२३ या स्पर्धेच्या विजेत्याने दान केलेला सेकंडहँड टी-शर्ट! त्यावर लिहिलं आहे, ‘प्राऊड ओनर ऑफ द वर्ल्ड्स अगलीएस्ट लॉन’.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया