शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये बनलाय जगातील सगळ्यात उंच काचेचा पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:17 IST

चीनच्या या काचेच्या पुलावरुन चालणं म्हणजे काही लोकांना एका अर्थी चित्तथरारक वाटतं तर काही लोकांना भयानक आणि जीवघेणं वाटतं.

ठळक मुद्देजमिनीपासून तब्बल २१८ मीटर उंचीवर तुम्हाला कोणी उभं राहायला सांगितलं तर तुमचं उत्तर काय असेल?जगभर अनेक पुल आहेत जे प्रचंड उंचीवर बांधलेले आहेत. तिथं जाऊन एकदा तरी तो थरार अनुभवण्याची पर्यटकांची इच्छा असते. खाली खोल दरी आणि वर पांढरंशुभ्र आकाश आणि चहूबाजूला निसर्गाचा चमत्कार म्हणावा असं हिरवंगार सौंदर्य.

चीन : जमिनीपासून तब्बल २१८ मीटर उंचीवर तुम्हाला कोणी उभं राहायला सांगितलं तर तुमचं उत्तर काय असेल? जगभर अनेक पुल आहेत जे प्रचंड उंचीवर बांधलेले आहेत. तिथं जाऊन एकदा तरी तो थरार अनुभवण्याची पर्यटकांची इच्छा असते. असाच एक हटके थरार अनुभवण्यासाठी चीनमध्ये एक काचेचा ब्रीज बनवण्यात आलाय. हा ब्रीज जवळपास २१८ मीटर उंच आहे. खाली खोल दरी आणि वर पांढरंशुभ्र आकाश आणि चहूबाजूला निसर्गाचा चमत्कार म्हणावा असं हिरवंगार सौंदर्य. असा नजारा पाहायला कोणाला आवडणार नाही? चीनच्या शिजीयाजूआंग येथे या ब्रीजचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. जगातला हा सगळ्यात मोठा ब्रीज आहे असंही म्हणण्यात येतंय.

तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जातंय. नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या देशाला अधिक गतीशील करण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून चीनमध्येही हा काचेचा पूल बांधण्यात आलाय. पीपल्स डेलीने या पुलाचा एक व्हिडिओही फेसबूकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहतानाच अंगावर काटे उभे राहतात. कारण दगड मातीच्या ब्रीजवर आपण कदाचित एवढ्या उंचावर उभे राहूही, पण काचेच्या पुलावर उभं राहणं जरा जास्तच थरारक असेल. ज्यांना थरारक गोष्टींना अनुभवण्याची सवय आहे, तेच या ब्रीजवर जाऊ शकतात. कारण एवढ्या उंचावर चालणं आणि चालताना आपल्या पायाखाली काच आहे हे मनात ठेवून पुढे पुढे जाणं काही ऐरागबाळ्याचं काम नाही. 

हांगीगुई सीनिक विभागात दोन बाजूच्या दरम्यान ४८८ मीटरचा हा पूल बांधण्यात आलाय. हा ब्रीज जमिनीपासून २१८ मीटर उंच आहे. म्हणजे जवळपास या उंचावर ६६ मजल्यांची इमारत उभी राहू शकते. हा पूल बनवण्यासाठी तब्बल २ हजार कामगारांची गरज लागली आहे. या पुलावर ५०० लोक एकावेळी राहू शकतात. हा पूल म्हणजे निसर्ग, थरार आणि तंत्रज्ञान जवळून पाहण्याची अनोखी संधी आहे. इस्त्रायल आर्किटेक्चर हेम डोटन यांनी हा पूल बांधला असून अवघ्या दीड वर्षात हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल तयार होण्यासाठी जवळपास ४४ हजार कोटीहून खर्च आला असल्याचंही सांगण्यात येतंय.

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय