शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 10:15 IST

चीनचा रिअल इस्टेट ग्रुपच एव्हरग्रँड जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडिअम उभारणार आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे विस्कटलेली घडी आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. जेथून कोरोना व्हायरस पसरला ते केंद्र वुहानमधील लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. याचवेळी जगाला कोरोनाच्या लढ्यामध्ये गुंतवून आपली ताकद दाखविण्याची चीन एकही संधी सोडत नाहीय. युरोपनंतर भारतात कोसळलेल्या शेअरबाजारात गुंतवणूक करण्यात येत होती. मात्र, दोन्ही ठिकाणी बंधने आणण्यात आली आहेत. आता चीन जगातील सर्वात मोठे स्टेडिअम उभारण्याच्या तयारीत असून महत्वाचे म्हणजे हे स्टेडिअम कमळाच्या आकाराचे असणार आहे. 

चीनचा रिअल इस्टेट ग्रुपच एव्हरग्रँड जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडिअम उभारणार आहे. यासाठी १.७ अब्ज डॉलर म्हणजेच १३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्टेडिअमची क्षमता १ लाख प्रेक्षकांची असणार आहे. सद्या बार्सिलोनाचा कँप नाऊ जगातील सर्वात मोठे स्टेडिअम आहे. यामध्ये ९९३५४ प्रेक्षक बसू शकतात. 

ग्वांगझूमध्ये हे स्टेडिअम बांधण्यात येणार असून २०२२ पर्यंत तयार होणार आहे. गेल्या आठवड्यात याचे कामही सुरु जाले आहे. हे स्टेडिअम चीनची फुटबॉल क्लब ग्वांगझू एव्हरग्रँडचे घरचे मैदान असणार आहे. कंपनीचे अध्यक्ष शिया हुजैन यांनी सांगितले की, आमचे लक्ष्य सिडनीचे ओपेरा हाऊस आणि दुबईचा बुर्ज खलिफा याच्याशी तुलना करणे आहे. हे स्टेडिअम जगातील चीनची ओळख बनेल.  २०२३ च्या आशियाई स्पर्धेची सुरुवात या स्टेडिअममधून केली जाईल. 

ग्वांगझूला फुलांचे शहर म्हटले जाते. यामुळे या स्टेडिअमचा आकार कमळाच्या फुलासारखा ठेवण्यात आला आहे. याचे प्रारुप शांघायमधील अमेरिकी डिझायनर हसन सईद याने तयार केले आहे. बांधकाम ३ लाख स्क्वेअर मीटर असणार आहे. यामध्ये १६ व्हीव्हीआयपी रुम, १५२ खासगी रुम, फिफाच्या सद्स्यांसाठी आणि खेळाडुंसाठी वेगवेगळ्या खोल्या आणि प्रसारमाध्यमांसाठी वेगळी सोय करण्यात येणार आहे. ईएसपीएननुसार अशाप्रकारचे तीन स्टेडिअम बनविण्यात येणार आहेत. यांची क्षमता ८० हजार ते १ लाख असणार आहे. चीनमध्ये यंदा फिफा वर्ल्डकप होणार होता. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा १ वर्ष पुढे ढकलण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल