शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:46 IST

ओशाना भागातील ओमपुंडजा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे एडोल्फ हिटलर उनोना यांच्या विजयाची चर्चा त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा त्यांच्या वादग्रस्त नावामुळे अधिक होत आहे.

संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धात दुःख देणाऱ्या नाझी हुकूमशहा एडोल्फ हिटलरच्या नावाने एका राजकारणी व्यक्तीने आफ्रिकेतील नामिबिया देशात सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. ओशाना भागातील ओमपुंडजा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे एडोल्फ हिटलर उनोना यांच्या विजयाची चर्चा त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा त्यांच्या वादग्रस्त नावामुळे अधिक होत आहे.

७० वर्षांनंतरही नाझी नावाची भीती ५९ वर्षीय एडोल्फ हिटलर उनोना हे साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन या पक्षाचे सदस्य आहेत. २०१० पासून ते आपल्या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांचे हे नाव जगातील अनेक लोकांना घाबरवणारे असले तरी, या विजयाचा नाझी विचारधारेसोबत कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या नावामुळे होणारा अपमान आणि प्रतिमा खराब होण्याचा धोका लक्षात घेऊन उनोना यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्थानिक वृत्तपत्रांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या ओळखपत्रातून मधले नाव 'हिटलर' काढून टाकले आहे आणि आता ते केवळ 'एडोल्फ उनोना' म्हणून ओळखले जावे, अशी त्यांची इच्छा आहे.

"माझे नाव एडोल्फ हिटलर नाहीये, मी एडोल्फ उनोना आहे. लहानपणी मला हे एक सामान्य नाव वाटत होते. मी मोठा झाल्यावर जाणवले की या व्यक्तीने जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगली होती. माझा त्या विचारधारेशी कोणताही संबंध नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. नामीबिया हा १८८४ ते १९१५ या काळात जर्मन वसाहत असल्याने येथे जर्मन नावे असणे सामान्य आहे. मात्र, या नावाने एका नेत्याने सलग पाच वेळा निवडणूक जिंकणे ही एक अनोखी घटना आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Namibia: 'Adolf Hitler' wins again, drops name after controversy.

Web Summary : Namibian politician Adolf Hitler Uunona, elected for the fifth time, sparked global controversy. He's now dropped 'Hitler' from his official name to distance himself from the Nazi dictator, emphasizing no ideological connection.
टॅग्स :Germanyजर्मनी