शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शांतता, तिथे मानवतेची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 04:24 IST

देशोदेशी अंतर्गत होणारी देवाण घेवाण ही सुरूच राहणार असल्याने, शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे.

- दाजी कोळेकरइंटरनेटचे जाळे, खुले आर्थिक धोरण (उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण) आणि स्मार्ट फोन यामुळे ‘जग एक खेडे’ बनले आहे. आपल्या देशात एके काळी खेडी स्वयंपूर्ण होती; पण हे जगरूपी खेडे स्वयंपूर्ण होणार नाही. देशोदेशी अंतर्गत होणारी देवाण घेवाण ही सुरूच राहणार असल्याने, शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे. म्हणून २१ सप्टेंबर हा जागतिक शांतता दिन साजरा करण्यात सुरुवात झाली आहे. उद्या जगभर हा दिवस साजरा होईल; पण शांततेचे काय? याबाबत थोडेसे...मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे; पण जगभराचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले. परिणामी, जागतिक अशांतता निर्माण झाली. त्यातील एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली दोन जागतिक महायुद्धे. या दोन युद्धांमुळे जगातील अनेक राष्टÑांचे अपरिमित नुकसान झाले. तरीही जग तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसतेय, मग तेलापायी वा पाण्यापायी. अशा स्थितीत जागतिक शांतता दिन ही साजरा होतोय. हा एक चांगला संदेश असून, एक शांततामय जीवनाच्या आशेचा किरण म्हणावा लागेल.जागतिक शांतता धोक्यात आणण्यामध्ये आतंकवाद हा मोठा घटक असून, त्याची झळ अनेक देशांना बसली आहे व बसत आहे. काही राष्टÑांना तर आतंकवादी राष्टÑे म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे. यावरून आंतकवादाचे रूप किती भयानक आहे हे दिसून येते. आंतकवाद ही एक जागतिक समस्या असून, त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येत असते. जगातील अनेक राष्टÑे आतंकवादाने पोखरून निघाली आहेत.आपल्या देशात आतंकवादाने कहरच केला आहे. नेहमी कुठे ना कुठे कारवाया होत असतात. जगाचे लक्ष असलेल्या काश्मीरच्या वादामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. आपल्या शेजारील देश शेजारधर्म पाळत नसल्याने आपली संरक्षण यंत्रणा नेहमी सज्ज ठेवावी लागते. तसेच वेळोवेळी विविध चाचण्या आणि अणुशक्तीमधून आपली ताकद दाखवून द्यावी लागते. जगामध्ये आशिया खंड हा आतंकवादाचा अड्डा असल्याचे बोलले जाते. काही राष्टÑांनी अणुबॉम्ब तयार करून जागतिक करार भंग केले आहेत.खरे तर जागतिक शांतता ही एखाद्या राष्टÑातील काही घटनांवरून साधता येत नाही. त्यासाठी विश्वव्यापी पुढाकार घेतला पाहिजे. कारण मूलभूत व चिरंतन विकासातून मानवी कल्याण होण्यासाठी शांतता अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत एक धाक आणि दुसरा अहिंसा; पण खरे तर यातील अहिंसेचा दुसरा मार्गच पत्करणेकाळाची गरज आहे.जगाला शांततेचा संदेश देणाºया धर्माचे आचरण होणे गरजेचे आहे. अलीकडे मानवाच्या मूलभूत गरजा आणि भौतिक हव्यास वाढत चालला असून, वाढते लोकसंख्या व नागरीकरण यातून मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी, माणूस आंतकवादाकडे वळू पाहत आहेत. त्यासाठी शांततेची गरज असून पहिले, दुसरे महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध नको. कारण, ते या खेडेरूपी जगाला परवडणारे नाही. नाहीतर हे खेडे अलीकडच्या शस्त्रसामुग्रीमुळे बेचिराख होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मानवता हाच धर्म मानून जगाला शांततेचा संदेश दिला पाहिजे. म्हणून ज्या देशात शांतता नांदेल म्हणजे जगात शांतता नांदेल मानवतेची सत्ता येईल. म्हणजेच मानवी कल्याणला वाव मिळेल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण होण्यास मदत होईल. म्हणून जिथे शांतता असेल तिथे मानवता आहे म्हणावे लागेल, कारण शांतता हे मानवी विकासाचे मूळ आहे.