शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक जनचळवळ हवी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:52 IST

हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले

संयुक्त राष्ट्रे : हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे आयोजिलेल्या हवामानविषयक परिषदेत ते बोलत होते.पॅरिसमधील परिषदेत झालेल्या हवामानविषयक करारातील तरतुदींशी प्रामाणिक राहून भारताने १७५ गिगावॅट इतके बिगरजीवाश्म इंधन उत्पादित करण्याचे लक्ष्य राखले आहे अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. तो धागा पकडून मोदी म्हणाले की, बिगरजीवाश्म साधनांतून २०२२ सालापर्यंत १७५ गिगावॅट अपारंपारिक उर्जेची निर्मिती करण्यात येईल व हे प्रमाण कालांतराने ४०० गिगावॅटपर्यंत वाढवण्यात येईल.ह्यूस्टन येथे रविवारी झालेल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमाला मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. दोन्ही देशांचे संबंध दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची भावना या नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र हवामान बदलाबाबत अमेरिका व भारताचा दृष्टीकोन वेगळा आहे. पॅरिसच्या हवामान करारातून २०१७ साली अमेरिकेने अंग काढून घेतले होते. भारत व चीनच्या कृत्यांमुळे आम्हाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे असा आरोप त्यावेळी ट्रम्प यांनी केला होता. या करारामुळे सर्वाधिक फायदा होणाऱ्या देशांना अधिक पैसे देण्याची पाळी अमेरिकेवर येईल असा आक्षेप ट्रम्प यांनी घेतला होता.आता चर्चा नको, तर कृती हवीनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर त्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत हे आपण आधी मान्य केले पाहिजे. चर्चा करण्याचे दिवस संपले, आता कृती करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ