बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:59 AM2020-03-10T09:59:14+5:302020-03-10T10:00:06+5:30

पॉर्नहब नावाच्या साइटनं आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या वेबसाइटवरून काढलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

world biggest adult video site under people want shut down vrd | बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम

बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम

Next

वॉशिंग्टन: बलात्कार आणि लैंगिक शोषणासंबंधी व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी जगातल्या सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी एक ऑनलाइन मोहीमही सुरू करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाख 80 हजारांहून अधिक लोकांना स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पॉर्नहब नावाच्या साइटनं आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या वेबसाइटवरून काढलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

theguardian.comच्या रिपोर्टनुसार, पॉर्नहबविरोधातील या मोहिमेला Exodus Cry नावाच्या अमेरिकेतील समूहानं सुरुवात केली आहे. तसेच त्याला ब्रिटनमधील एका कार्यकर्त्यानंही पाठिंबा दिला आहे. पॉर्नहब चालवणाऱ्या साइटचं कार्यालय ब्रिटनमध्येही आहे. Exodus Cryच्या फाऊंडर लैला मिकेलवेट म्हणाल्या, ही कंपनी कोट्यवधी रुपये कमावते, परंतु प्रभावी यंत्रणा तयार करण्यात ती सपशेल अपयशी ठरली आहे. change.org नावाच्या वेबसाइटवर पॉर्नहबविरोधात मोहीम चालवण्यात आली आहे. पॉर्नहब एकतर बंद करा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षम करा, असंही म्हणण्यात आलं आहे. 

खरं तर पॉर्नहब ही युरोपमधील लग्जमबर्गमधील एक कंपनी आहे. परंतु याचं ऑफिस मॉन्ट्रिएल, लंडन आणि लॉस एन्जलिसमध्ये आहे. कंपनीनं आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गैर कायदेशीर कंटेट हटवण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे. अल्पवयीन मुलांचे व्हिडीओसुद्धा कंपनीकडे हटवण्याची यंत्रणा आहे.

Web Title: world biggest adult video site under people want shut down vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.