शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लॉकडाऊनमुळे चीनच्या iphone फॅक्ट्रीमध्ये खळबळ; जीव वाचवून 1 लाख कामगार गेले पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:21 IST

Apple च्या चीनमधील झेंगझाऊ येथील आयफोन फॅक्ट्रीतून एक लाखाहून अधिक कर्मचारी हे भीतीने पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीला अडीच वर्षांहून अधिक वेळ गेला असला तरी अद्यापही व्हायरसचा धोका संपलेला नाही. कोरोना व्हायरसची एन्ट्री झाल्यापासून सातत्याने नवनवीन स्ट्रेन आणि व्हेरिएंट समोर येत आहेत. जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाच आता पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनने झीरो कोविड पॉलिसी अंतर्गत ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे लॉकडाऊन लागू केला आहे. 

चीनमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिग्गज कंपनी Apple च्या चीनमधील झेंगझाऊ येथील आयफोन फॅक्ट्रीतून एक लाखाहून अधिक कर्मचारी हे भीतीने पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॅक्ट्रीच्या भिंतीवरून अनेकांनी उड्या मारल्या. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. आयफोनचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र झेंगझोऊ येथे आहे. ज्यात सुमारे 2 लाख कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर फॅक्ट्रीच्या असेंब्ली लाईनवर तैनात असलेल्या कामगारांना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. 

कर्मचार्‍यांना अशा परिस्थितीत जीवाची भीती वाटू लागली असून त्यांनी हे काम सोडण्यास सुरुवात केली आहे. फॉक्सकॉनकडून असे सांगण्यात आले आहे की, फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा बाहेरील लोकांशी कोणताही संपर्क नाही आणि व्यवस्थापन संक्रमण नियंत्रित करण्यासाठी 'क्लोज-लूप' पद्धत अवलंबत आहे. फॉक्सकॉनने संक्रमित कर्मचार्‍यांची संख्या आणि त्यांच्या उपचार पद्धतींबद्दल देखील माहिती दिलेली नाही. 

कोरोना संसर्गाच्या वाढीमुळे आयफोन उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबत फॉक्सकॉनने सांगितले की, अशा प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी इतर फॅक्ट्रीशी समन्वय साधेल. या फॅक्ट्रीतील किती कामगार निघून गेले हे स्पष्ट झालेले नाही. पण झेंगझोऊ फॅक्ट्रीतील कामगार आणि सोशल मीडिया फोरमवर उपलब्ध माहितीनुसार फॉक्सकॉनच्या फॅक्ट्रीतील सुमारे दहा लाख कामगार निघून गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपलcorona virusकोरोना वायरस बातम्या