शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! लग्नाचं फोटोशूट थांबवून 'त्या'ने वाचवलं बुडणाऱ्या मुलाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:37 IST

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट असते. सध्या प्री वेडिंग फोटोशूट, तसंच लग्नाचं फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड आहे.

ओटावा : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट असते. सध्या प्री वेडिंग फोटोशूट, तसंच लग्नाचं फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड आहे. लग्नातील प्रत्येक गोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तरीही लग्नामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्या कायमस्वरुपी आठवणीत राहतात. असाच प्रसंग कॅनडातील एका लग्नात घडला. ओटावा येथील अ‍ॅन्टारिओ पार्कमधल्या तलावाकाठी प्रि-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या क्लेटनसाठी हा दिवस असाच वेगळ्या कारणासाठी स्मरणात राहील. कारण शूट करता करता त्याने अचानक तलावात उडी घेतली आणि एका बुडणाऱ्या मुलाला वाचवलं.

क्लेटन कूक त्याची पत्नी ब्रिटनीसोबत लग्नाचं फोटोशूट करत होता. त्यावेळी ऑन्टारिओ पार्कमधील तलावात एक मुलगा बुडत असल्याचं त्याने पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता, क्लेटनने तात्काळ तलावात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. हॅट फोटोग्राफी फेसबुक पेजवर या संपूर्ण घटनेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. क्लेटन्स हिरोईजम, असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.

लोकांनी क्लेटनने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे. अर्थात प्रि वेडिंग फोटोशूटला नवा कोरा कोट पाण्यात चिंब भिजवलेला नवरा पाहून त्या नवरीच्या भुवया ताणल्या जाण्याची शक्यता होती. पण नव्हे; तिनेही क्लेटनचं कौतुक केलं आहे.