शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 17:09 IST

सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देरिसॉर्ट सुरु करण्याची प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घोषणारिसॉर्टचे बांधकाम 2019 मध्ये सुरु करण्यात येणाररिसॉर्ट 2020 मध्ये पूर्ण होण्याची शक्यतामहिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा

रियाध, दि. 4 - सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे. येथील नॉर्थवेस्ट कोस्टलाइनजवळ रिसॉर्ट उभे करण्यात येणार आहे.  सौदीतील अर्थव्यवस्था वाढविण्याच्यादृष्टीने बीचवर रेड सी रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. सौदीच्या पब्लिक इन्वेस्टमेंट फंडने दिलेल्या माहितीनुसार, लग्झरी रिसॉर्टमध्ये जगभरातील पर्यटक येतील. येथे येणा-या पर्यटकांना पॅरॉशूट, ट्रॅकिंग अशा अनेक अॅक्टिव्हिटीज् या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तसेच, या रिसॉर्टचे बांधकाम 2019 मध्ये सुरु करण्यात येणार असून 2020 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  दरम्यान, सौदीत महिलांच्याबाबतील अनेक नियम आहेत. त्यामुळे येथील महिला गाडी चालवू शकत नाहीत किंवा आपल्या नव-याच्या परवानगीशिवाय कोठेही प्रवास करु शकत नाहीत. तसेच, महिलांना घराबाहेर पडायचे असेल, तर त्यांना आपले केस आणि शरीर झाकावे लागते. गेल्याच महिन्यात एका महिलेला मिनीस्कर्ट परिधान केल्यामुळे अटक करण्यात आली होती. अशाप्रकारचे अनेक कायदे सौदीत महिलांच्याबाबतीत तयार करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना आत्तापर्यंत महिलांचा बिकीनीत बीचवर जाण्याचा संबंधच येत नव्हता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या रिसॉर्टच्या निर्मितीनंतर या ठिकाणी महिलांना बिकनी परिधान करता येणार आहे. याचबरोबर, सध्या सौदीतील रिसॉर्टमध्ये मद्यपान करण्यास बंदी घातलेली. त्यामुळे आगामी काळात या रिसॉर्टमध्ये मद्यपानास मुभा देण्यात येणार आहे का, या अद्याप कोणत्याही निर्णय घेण्यात आला नाही.