शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ऑनलाइन भीक मागून 'तिने' कमावले 17 दिवसांत 35 लाख रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 12:06 IST

या महिलेने आरोपी महिलेने सर्वात आधी तिचे सोशल मिडीयावर अकाऊंट बनवले. त्यानंतर मुलांसोबतच्या फोटोचा वापर करत तिने लोकांकडे आर्थिक मदतीची विनवणी केली

दुबई - सध्या सोशल मिडीयाचा वापर लोक कसे करतील याचा नेम नाही. सोशल मिडीयाचा वापर करुन अनेकांना फसविण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र आता नवीन प्रकार आलाय ज्यामध्ये लोकांच्या भावनेला हात घालून त्यांच्याकडून पैसे कमविण्याचा. संयुक्त अरब अमीरात(UAE)मध्ये पोलिसांनी ऑनलाइन भिकारी बनून लोकांना फसविणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ही महिला सोशल मिडीयाचा वापर करुन लोकांना भावनिक करत त्यांच्याकडून पैसे लाटण्याचं काम करत होती. 

मी घटस्फोटीत असून माझ्या मुलांचा संभाळ करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगून या महिलेने सोशल मिडीयावर तिचा आणि तिच्या मुलांचा फोटो शेअर केला. अवघ्या 17 दिवसात या महिलेने 35 लाख रुपये लोकांकडून जमा केले. मात्र ज्यावेळी या महिलेच्या पतीने मुलांचा फोटो सोशल मिडीयावर पाहिला त्यानंतर हा प्रकार समोर आला. आपल्या मुलांचा भिक मागण्यासाठी वापर केला जात असल्याचं पाहिल्यानंतर पतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली. 

दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने आरोपी महिलेने सर्वात आधी तिचे सोशल मिडीयावर अकाऊंट बनवले. त्यानंतर मुलांसोबतच्या फोटोचा वापर करत तिने लोकांकडे आर्थिक मदतीची विनवणी केली. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिने अनेकांची फसवणूक केली.  दुबईचे पोलिस अधिकारी अल जल्लाफ यांनी सांगितले की, ही महिला लोकांकडे मी घटस्फोटीत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत अशी बतावणी करत असे. मात्र तिच्या नवऱ्याला मित्रांचे आणि नातेवाईकांचे फोन आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. तिने अवघ्या 17 दिवसांमध्ये 50 हजार डॉलर(35 लाख रुपये) लोकांकडून गोळा केले होते. 

सोशल मिडीयाचा वापर करत लोकांना भावनिक करणे, आणि फसवणूक करणे याला दुबईत गुन्हा मानला जातो. त्यामुळे या महिलेला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच अशाप्रकारे सोशल मिडीयाचा गैरवापर करुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.  

टॅग्स :DubaiदुबईfraudधोकेबाजीPoliceपोलिस