शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कोरोना संकटात नवा धोका; हंता विषाणूच्या एन्ट्रीनं वाढवली चिंता, आरोग्य विभाग सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 11:25 IST

उंदरांच्या संपर्कात आल्यानं हंता विषाणूची लागण; महिलेची प्रकृती गंभीर

मिशिगन: अमेरिका अजूनही कोरोना संकटातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. कोरोना विषाणूचा कहर अनुभवणाऱ्या अमेरिकेत आता नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका महिलेला हंता विषाणूची लागण झाली आहे. तिच्यात हंता विषाणूची लक्षणं आढळून आली आहेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.स्थानिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिशिगन राज्यातील वाशटेनॉ काऊंटीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. हंता विषाणूची लागण झालेली महिला दोन वर्षांपासून बंद असलेल्या एका घराची साफसफाई करत होती. त्याचवेळी ती उंदरांच्या संपर्कात आली. त्यानंतर तिच्यात हंता विषाणूची लक्षणं दिसू लागली.दहा किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग, अमेरिकेत सायन्स जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्धहंता विषाणू उंदरांकडून पसरतो. उंदरांची लाळ, लघवी आणि मल यांच्यामुळे हंता विषाणूची लागण होते. हंता विषाणूची लागण होण्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना नाही. अमेरिकेत १९९३ पासून हंता विषाणूबद्दल संशोधन सुरू आहे. अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. मात्र कोरोना संकटात हंताची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. हंताची लागण झालेल्यांपैकी ४० टक्के लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हंता विषाणू चिंतेचा विषय आहे.कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला. चीननंतर युरोप, अमेरिका आणि भारताला याचा मोठा फटका बसला. चीनमधील कोरोनाचं संकट इतर देशांच्या तुलनेत लवकर नियंत्रणात आलं. मात्र त्यानंतर तिथे हंता विषाणू पसरला. त्यामुळे काही दिवस देशात घबराट पसरली. हंता विषाणूमुळे चीनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे हंता विषाणू माणसांमधून माणसांमध्ये पसरत नाही. त्याची लागण केवळ उंदिर, खारींच्या संपर्कात आल्यावरच होते.