शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! संसदेत महिला खासदार करत होती ऑनलाईन शॉपिंग; विरोधी पक्षाने शेअर केला 'तो' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:38 IST

महिला खासदार संसदेत जीन्स आणि टॉपची ऑनलाईन खरेदी करताना दिसल्या आहेत. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

संसदेचं कामकाज सुरू असताना काही जण झोपतात तर काही जण गेम खेळतात असे विविध प्रकार जगभरात समोर आले आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक महिला खासदार संसदेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. मलेशियामध्ये ही घटना घडली आहे. महिला खासदार संसदेत जीन्स आणि टॉपची ऑनलाईन खरेदी करताना दिसल्या आहेत. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

मलेशियाचे माजी खासदार वी चू केओंग यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर गाझी बूटा नावाच्या महिला खासदाराचा फोटो पोस्ट केला गेला आहे. फोटोत या महिला खासदार त्यांच्या लॅपटॉपवरून 'जीन्स आणि टॉप' ऑर्डर करताना दिसत आहेत. या ट्वीटमध्ये माजी खासदाराने महिला खासदारावर आरोप केला आहे की, त्या कोणतंही काम न करता फुकट पगार घेत आहेत आणि मलेशियाची संसद म्हणजे सर्कस झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मलेशियाचे माजी पंतप्रधान दातुक सेरी नजीब रझाक यांनीही महिला खासदाराचा हा फोटो पाहिला आणि शेअरही केला. महिला खासदाराची खिल्ली उडवत माजी पंतप्रधानांनी लिहिलं, कदाचित या महिला खासदार त्यांचे सरकार आल्यानंतर वस्तूंच्या वाढलेल्या किमती पाहत आहेत. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत या महिला खासदाराची जोरदार खिल्ली उडवली आणि काही नेटकऱ्यांनी संसदेचं कामकाज सोडून ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे टीकाही केली.

फोटो व्हायरल झाल्यानंतर महिला खासदाराला स्वतःची बाजू स्पष्ट करावी लागली. 'शॉपिंग करत नव्हते. तर फोटोमध्ये कैद झाली ती त्यांच्या लॅपटॉपवरील जाहिरात होती' असं म्हटलं आहे. जाहिरात दिसत असतानाच कोणीतरी फोटो काढला आणि आता तो शेअर केला जात आहे. सरकारकडे टीका करण्यासाठी कोणताच दुसरा मुद्दा नाही त्यामुळेच ते अशा गोष्टीने वाद निर्माण करत आहेत असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके