शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वजनदार ! 7 किलो वजनाच्या बाळाला जन्म, आई आणि बाळाची तब्येत ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 09:53 IST

व्हिएतनाम येथे एका महिलेने 7.1 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. दक्षिण आशियाई देशातील हे सर्वात वजनाचे बाळ ठरले आहे. महिला आणि बाळाची तब्बेत व्यवस्थित असल्याचं सांगितलं जात असून, काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. 

हनोई - व्हिएतनाम येथे एका महिलेने 7.1 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. दक्षिण आशियाई देशातील हे सर्वात वजनाचे बाळ ठरले आहे. महिला आणि बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याचं सांगितलं जात असून, काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. 

बाळाचे वडील त्रान वान कुआन यांनी सांगितलं की, 'जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुमचं बाळ 7.1 किलो वजनाचं आहे. तेव्हा आमचा कोणाचा विश्वासच बसत नव्हता'. डॉक्टरांनी प्रसूती करण्याआधी बाळाचं वजन जवळपास पाच किलो असेल अशी कल्पना आई आणि वडिलांना दिली होती. व्हिएतनाममध्ये एवढ्या वजनाचं बाळ जन्मण्याची ही काही पहिलीच घटना नाही. 2008 रोजीदेखील एका महिलेने सात किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला होता. 

हे बाळ या दांपत्याचं दुसरं अपत्य आहे. 2013 रोजी महिलेने 4.2 किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार आतापर्यंत सर्वात जास्त वजनी बाळ इटलीत जन्मलेलं आहे. या बाळाचं वजन 10.2 किलो होतं. इटलीमध्ये 1995 रोजी एका महिलेने या बाळाला जन्म दिला होता. 

कोल्हापुरात जन्मले राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ कोल्हापूर येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून हे कोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे. प्रसुती झालेल्या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात.

माहेर कोल्हापुरात असल्याने त्या प्रसुतीसाठी येथे आल्या. त्या डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे उपचार घेत होत्या. एखाद्या बाळाची उंची किंवा वजन जास्त असेल तर मातेची नैसर्गिक प्रसुती होत नाही. मात्र, या बाळाच्या मातेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.

वजन आणि उंची दोन्हीच्या जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ आहे. यापूर्वी गुजरातमधील बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे. राज्यात पहिल्यांदाच हे पाच किलो वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल