शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एक्स बॉयफ्रेंड पासून संरक्षण मिळवण्यासाठी नेमला बॉडीगार्ड पण पडली त्याच्याच प्रेमात; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:21 IST

आपल्या एक्स पार्टनरचं गैरवर्तन आणि बॉडीगार्डच्या प्रेमात पडण्यापर्यंतची कहाणी नुकतीच स्वतः सांगितली आहे.

एका महिलेने आपल्या एक्स पार्टनरच्या हिंसक वर्तनापासून वाचण्यासाठी स्वतःकरता बॉडीगार्ड नेमला. काही दिवसांनी महिला त्याच बॉडीगार्डच्या प्रेमात पडली. महिलेने आता त्याच्याशी लग्न केलं आहे आणि ती सुखी जीवन जगत आहे. आपल्या एक्स पार्टनरचं गैरवर्तन आणि बॉडीगार्डच्या प्रेमात पडण्यापर्यंतची कहाणी नुकतीच स्वतः सांगितली आहे.

एलिस स्टीव्हन्स असं या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, २००८ मध्ये स्टीव्हन्सला तिच्या जोडीदाराकडून इतका त्रास झाला की तिने आपल्या मुलीसह त्याच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र जोडीदाराचं हिंसक वर्तन पाहून काही जवळच्या लोकांनी तिला बॉडीगार्ड ठेवण्याचा सल्ला दिला. (Woman Fell in Love With Bodyguard)

एलिस स्टीव्हन्सने तिच्या आणि १३ वर्षांची मुलगी ग्रेसीच्या सुरक्षेसाठी एक खाजगी बॉडीगार्ड ठेवला. ३५ वर्षीय बॉडीगार्ड डेरेक स्टीव्हन्सचा बालपणीचा मित्र होता. डेरेक स्टीव्हन्स आणि तिची मुलगी ग्रेसी यांच्यासोबत त्यांच्या घरात राहत होता. सुरक्षा शुल्क म्हणून डेरेकला प्रति रात्र £75 (७ हजारांपेक्षा जास्त) मिळत असे.

दरम्यान, जोडीदारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मुलीसोबत एकटीच राहणारी स्टीव्हन्स तिचा बॉडीगार्ड डेरेकच्या प्रेमात पडली. डेरेकलाही स्टीव्हन्स आवडत होती. मात्र एके दिवशी जेव्हा स्टीव्हन्सने डेरेकला प्रपोज केलं तेव्हा त्यानं नकार दिला. स्टीव्हन्सने डेरेकला सांगितलं- 'माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे.' डेरेकने नकार दिल्यावर स्टीव्हन्सने त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं.

काही दिवसांनंतप डेरेकने हे प्रपोजल स्विकारलं आणि दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. मार्च 2009 मध्ये त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. आपल्या नात्याबद्दल बोलताना स्टीव्हन्सने सांगितलं की मला खूप अभिमान वाटतो की कोणीतरी माझी मदत केली. मी डेरेकला बॉडीगार्ड म्हणून कामावर ठेवलं. मात्र त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्याजवळ मला सुरक्षित वाटू लागलं. तर डेरेकचं म्हणणं आहे की हे पहिल्या नजरेत झालेलं प्रेम आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके