शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी भरलेल्या विमानात तरुणीने सुकायला टाकले अंतर्वस्त्र, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:32 IST

विमानात अनेकदा सहप्रवाशांच्या प्रतापामुळे त्रास सहन करावा लागत असतो. प्रवाशांच्या वेगवेगळ्या त-हा आणि त्यांच्या गैरवर्तवणुकीचा सामना इतरांना करावा लागत असतो.

मॉस्को - विमानात अनेकदा सहप्रवाशांच्या प्रतापामुळे त्रास सहन करावा लागत असतो. प्रवाशांच्या वेगवेगळ्या त-हा आणि त्यांच्या गैरवर्तवणुकीचा सामना इतरांना करावा लागत असतो. कधी कोणी अश्लील कृत्य करत असतं, तर अनेकदा एखाद्या प्रवाशाचं लहान मूल रडून रडून तुमच्या सुखद प्रवासाचं स्वप्न भंग करत असतं. अनेकदा अशा परिस्थितींमध्ये इतर प्रवासी शांत बसून प्रवास कधी संपेल याची वाट पाहत असतात. पण सध्या एका तरुणीचा विमानातील व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती विचित्रपणे वागत आहे. प्रवाशांनी भरलेल्या विमानात ही महिला प्रवासी आपलं अंतर्वस्त्र काढून सुकवत आहे. तरुणीचं हे वागणं पाहून इतर प्रवासी मात्र आश्चर्यचकित झाले होते. तरुणीचा विमानातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रशियामधील उरल एअरलाइन्समध्ये हा प्रकार घडला आहे. हे विमान टर्कीमधील अंटाल्या येथून रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने प्रवास करत होतं. यावेळी विमानात अचानक एक तरुणी आपलं अंतर्वस्त्र डोक्यावर असलेल्या एसीजवळ नेऊन सुकवण्याचा प्रयत्न करु लागली. जवळपास एक मिनिटाच्या व्हिडीओत तरुणी हे करत असल्याचं दिसत आहे. विमानातच प्रवास करणा-या एका प्रवाशाने यावेळी तरुणीचा व्हिडीओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.