शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ही महिला ठरू शकते किम जोंगची उत्तराधिकारी, याआधीही दाखवलेत नेतृत्वगुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 20:14 IST

शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देउत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशाह किम जोंग ऊन याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहेत्यामुळे किम जोंगचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा रंगू लागली आहे.किम जो ऊनची उत्तराधिकारी म्हणून त्याची बहीण किम यो जोंग हिचे नाव आघाडीवर आहे.

सियोल -  उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशाह किम जोंग ऊन याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एक जटिल शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे किम जोंगचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा रंगू लागली आहे. 

 आता किम जो ऊनची उत्तराधिकारी म्हणून त्याची बहीण किम यो जोंग हिचे नाव आघाडीवर आहे. किम यो जोंग हिचा निर्णय घेणाऱ्या प्रमुख समितीत पुन्हा समावेश करण्यात आल्यानंतरच किम जोंगची प्रकृती बिघडल्याने संकेत मिळू लागले होते. किम यो जोंग ही किम जोंग ऊनची सल्लागार राहिली आहे. 

किम यो जोंग हिने 2018 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान आपल्या भावाच्या जागी देशाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षात तिचे वजन वाढले होते. तसेच किम जोंग ऊनची परराष्ट्रात प्रतिमा बनवण्यामागे किम यो जोंग हिचाच मोठा वाटा होता. कुणावरही विश्वास न ठेवणारा आणि अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या करणारा किम जोंग आपल्या बहिणीवर मात्र खूप विश्वास ठेवतो. 

31 वर्षीय किम यो जोंग ही उत्तर कोरियाचे दिवंगत हुकूमशहा किम जोंग इल यांची सर्वात लहान मुलगी आहे.  आता किम जोंग ऊनचा मृत्यू झाल्यास किम यो जोंग हिच्याकडे सत्ता सोपावण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया