शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता दोन राजपुत्र पुन्हा येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 06:36 IST

राजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला

लंडन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर अंतिम दर्शनाच्या निमित्ताने राजपुत्र विलियम, हॅरी हे दोन भाऊ तसेच या दोघांच्या पत्नी असा सारा परिवार पुन्हा एकत्र दिसला ही अतिशय मोठी घटना मानली जात आहे. राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव रविवारी बाल्मोरलहून लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणण्यात आले. तिथे हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी चार दिवस ठेवण्यात येणार आहे. आजीमुळे पुन्हा दोन्ही नातू एकत्र अशा मथळ्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. राजपुत्र हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल हे दोघे राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अमेरिकेतून लंडनमध्ये आले आहेत. त्या वेळी युवराज हॅरी व विलियम यांचे एकत्रित छायाचित्र झळकले व हे दोन्ही राजपुत्र आता पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे. 

राजे चार्ल्स तिसरे यांनी घेतला पुढाकारराजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला. त्यानंतर विलियम यांनी अमेरिकेतून प्रिन्स हॅरी व मेगन यांना लंडनला बोलावून घेतले. 

यामुळे आला हाेता सख्ख्या भावांमध्ये दुरावाराजपुत्र हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ या उपाधीही सोडून दिल्या होत्या. ब्रिटनचे राजघराणे वंशद्वेषी असल्याचा आरोप युवराज हॅरी व मेगन मर्केल यांनी केला होता. या सर्व घटनांमुळे हॅरी व विलियम या सख्ख्या भावांमध्ये आलेला दुरावा चर्चेचा विषय बनला होता.