शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:45 IST

Masood Azhar News: भारत सरकारने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ लोक मारले गेले होते. आता पाकिस्तान सरकार त्याला कोट्यवधी रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरने कुख्यात दहशतवादीमसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मसूद अजहरचे भरपूर नुकसान झाले आहे.  मात्र, आता पाकिस्तान सरकार त्याच्या या जखमांवर मलम लावण्याचे काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सरकार मसूद अजहर याला नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानचे शाहबाज सरकार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला सरकारी मदत निधीतून एकूण १४ कोटी रुपये देणार आहे. ट्रिब्यून इंडियामधील एका वृत्तानुसार, पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अजहरला भरपाई म्हणून १४ कोटी रुपये देऊ शकते. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना पाकिस्तान सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्रत्येक मृताला १ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.

मसूदला १४ कोटी कसे मिळू शकतात?भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. शाहबाज सरकार प्रत्येक मृतासाठी १ कोटी रुपये देईल. या हिशोबाने मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ लोकांचा मृत्यू झाल्याने त्याला पाकिस्तान सरकारकडून १४ कोटी रुपये मिळतील. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने ही भरपाई जाहीर केल्याचे म्हटले जात आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी तळं उद्ध्वस्त ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. याअंतर्गत, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ९ दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. भारताने बहलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. जैशचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. येथेच मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचे मृतदेह पडले होते. भारताच्या हल्ल्यात मसूद अजहरची बहीण आणि मेहुण्यासह १४ जणांचा मृत्यू झाला.

दहशतवादी मसूद अजहरने स्वतः यांची पुष्टी केली होती की, मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण आणि मेहुणे, एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले होती. मसूद अजहर आता त्याच्या कुटुंबात एकमेव जिवंत व्यक्ती उरला आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादmasood azharमसूद अजहरOperation Sindoorऑपरेशन सिंदूर