शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:27 IST

दहा लाख नागरिकांचे गाझातून पलायन, हजाराे लाेकांचा मृत्यू

जेरुसलेम : लोकांची निर्दयीपणे कत्तल केल्याचा बदला म्हणून हमासचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझा शहराला संपविण्यावर  इस्रायल ठाम आहे. गाझा शहरातील लोकांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांनी आपली इस्रायलने गाझा शहरात सैन्य घुसविल्यास आम्हीही युद्धात उतरू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची भीती आहे.

इस्रायली सैन्य गाझा सीमेवर असून, त्यांच्या मदतीला अमेरिकेच्या युद्धनौका आहेत. सध्या हमास आणि इस्रायलमध्ये दोन्ही बाजूंनी बॉम्बवर्षाव सुरू आहे. इस्रायली सैन्याने ब्लू लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करत ती ठिकाणे नष्ट केली. (वृत्तसंस्था)

पॅलेस्टिनींना प्रवेशबंदी करणाऱ्या देशांवर निक्की हॅले यांची टीकाnइस्रायल जमिनीवरून करणार असलेल्या चढाईपासून आपला जीव वाचविण्यासाठी असंख्य पॅलेस्टिनी नागरिक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याकरिता शेजारी अरब देशांत जाऊ पाहात आहेत. nपण, त्यांना इजिप्त, लेबनॉन, जॉर्डन आदी देशांनी प्रवेश नाकारला. त्याबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या निक्की हॅले यांनी अरब देशांवर कडक टीका केली. nत्या म्हणाल्या की, पॅलेस्टाइनमधील लोकांच्या भवितव्याबद्दल अरब देशांना चिंता वाटत नाही. 

आज नेमके काय झाले? nगाझातील संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या छावणीतील पाणी संपले आहे. nजनरेटरचे इंधन संपल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होण्याची भीतीnअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन  इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यताnगाझा शहरात सैन्य घुसविणे इस्रायलची चुकीची कृती : अमेरिका

हल्ले थांबवा, ओलिसांना सोडूइराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले करण्याची मोहीम थांबविल्यास हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या सुमारे २०० ओलिसांना सोडण्यास तयार आहे. दहशतवादी गटाने अशी ऑफर दिल्याचे मान्य केलेले नाही. 

युद्धामुळे द्वेष, केली सहा वर्षीय मुलाची हत्या७२ वर्षीय वृद्धाने सहा वर्षांच्या मुस्लीम मुलाची चाकूने हत्या केली तसेच त्याच्या  ३२ वर्षीय आईवर चाकूने वार करत गंभीर जखमी  केल्याचा प्रकार अमेरिकेतील इलिनॉयमध्ये घडला आहे. याप्रकरणी आरोपीवर  द्वेषाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष