शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध आज थांबणार? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् पुतिन चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:47 IST

"मी मंगळवारी अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणार आहे. गेल्या काही दिवसांत बरीच तयारी झाली आहे. आम्ही हे युद्ध संपवू शकतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले."

वॉशिंग्टन : ३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज, मंगळवारी (१७ मार्च) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.ट्रम्प यांनी फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला एअर फोर्स वनमधून प्रवास करताना पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, कदाचित मंगळवारपर्यंत काहीतरी मोठी घोषणा करता येईल. मी मंगळवारी अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणार आहे. गेल्या काही दिवसांत बरीच तयारी झाली आहे. आम्ही हे युद्ध संपवू शकतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सोमवारी सकाळी या चर्चेची पुष्टी केली. मात्र, त्यांनी चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही कधीच अशा बाबी अगोदर जाहीर करत नाही. दोन राष्ट्राध्यक्षांमधील संभाषणाचा तपशील आधीच जाहीर केला जात नाही. रशियाने तीन वर्षांपूर्वी युक्रेनवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यात पूर्ण यश मिळाले नाही. तरीही, रशिया अजूनही युक्रेनच्या मोठ्या भूभागावर ताबा ठेवून आहे.

ट्रम्प यांच्यावर संशयया चर्चेमुळे युद्धावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याची संधी ट्रम्प यांनामिळणार आहे. रोपियन देश ट्रम्प यांच्या पुतिन यांच्यासोबतच्या मवाळ भूमिकेबाबत आणि झेलेन्स्की यांच्याशी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत आहेत. झेलेन्स्की यांनी ओव्हल ऑफिसला भेट दिली तेव्हा वाद निर्माण झाला होता.

कोर्टाने सांगूनही स्थलांतरितांना पाठविले तुरुंगातट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या २६१ स्थलांतरितांना सुपरमॅक्स तुरुंगात पाठवले. अमेरिकेने  त्यांना ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचे सदस्य म्हटले आहे.या लोकांना हद्दपार करण्याच्या आदेशाला अमेरिकन कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतरही अमेरिकेने या लोकांना हद्दपार केले. 

२ एप्रिलपासून टॅरिफ, हा स्वातंत्र्याचा दिवस पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून नवीन शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या शेअर बाजारातील अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांमुळे चिंता व्यक्त केली जात असली, तरी ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. २ एप्रिल हा आमच्या देशासाठी स्वातंत्र्याचा दिवस असेल. मागील अनेक मूर्ख राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही ज्ञान नसताना देशाची संपत्ती इतरांना दिली. आम्ही ती पुन्हा मिळवणार आहोत.ते आम्हाला जितके शुल्क आकारतात तितके आम्ही आकारणार आाहोत. ऑटोमोबाइल्स, स्टील आणि ॲल्युमिनियमवरही काही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.

हे मुद्दे महत्त्वाचे ठरणारट्रम्प यांनी सांगितले की, युद्ध संपविण्यासाठीच्या चर्चेमध्ये भूभाग आणि वीज प्रकल्प महत्त्वाचे मुद्दे असतील. आम्ही भूभागाबद्दल बोलणार आहोत. आम्ही वीज प्रकल्पांबद्दल बोलणार आहोत. काही संसाधनांचे विभाजन कसे करायचे, याबाबत चर्चा होईल, असे ट्रम्प म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया