शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात शेख हसीनांच्या राजकीय पुनरागमनाची चर्चा; ढाक्यातून मिळाले 4 महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:34 IST

Bangladesh Violence: शेख हसीनांचा आवामी लीग हा बांग्लादेशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून, तब्बल 23 वर्षे सत्तेत राहिलेला आहे.

Bangladesh Violence: बांग्लादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची पक्ष आवामी लीग पुन्हा एकदा निवडणूक राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. ढाक्यातून मिळालेल्या चार महत्त्वाच्या घडामोडींमुळे आवामी लीगच्या पुनरागमनाची शक्यता बळावल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर आवामी लीगवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अलीकडील घटनाक्रम पाहता ही बंदी शिथिल होऊन पक्षाला पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. आवामी लीग हा बांग्लादेशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असून, तब्बल 23 वर्षे सत्तेत राहिलेला आहे.

शेख हसीनांच्या पुनरागमनाची चर्चा; 4 महत्त्वाचे मुद्दे

1) वाढत्या हिंसाचारामुळे कट्टरतावादी घाबरले

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच इक्बाल मंचचे नेते उस्मान हादी यांची हत्या झाली. हादी हे शेख हसीनांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जात होते. त्यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला असून, यामुळे अंतरिम सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर जमात-ए-इस्लामीचे अमीर, एनसीपीचे प्रमुख तसेच बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष यांनाही टार्गेट किलिंगची भीती वाटू लागली आहे. अनेक नेत्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी मागणी केली आहे. परिस्थिती लक्षात घेता सरकारने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, एनसीपीचे प्रमुख आणि शेख हसीनांचे कट्टर विरोधक नाहिद इस्लाम यांनी सार्वजनिकरित्या म्हटले आहे की, आवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली तर त्यांना हरकत नाही, मात्र शेख हसीनांचा थेट सहभाग नसावा. बीएनपीनेही आवामी लीगच्या निवडणूक सहभागास विरोध नसल्याचे संकेत दिले आहेत.

2) न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा बदल

आतापर्यंत अंतरिम युनूस सरकारला शेख हसीनांच्या प्रकरणात न्यायव्यवस्थेचा पाठिंबा मिळत होता. मात्र, अलीकडे न्यायव्यवस्थेच्या भूमिकेत बदल दिसून येत आहे. शेख हसीनांचे निकटवर्तीय मानले जाणारे जुबैर रहमान यांची बांग्लादेशचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 23 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल ट्रिब्युनलमधील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना जाहीर फटकारले. द डेली स्टारच्या वृत्तानुसार, सरकारी वकील ताजुल इस्लाम शेख हसीनांना तातडीने शिक्षा देण्याची मागणी करत होते. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की, संपूर्ण सुनावणीनंतरच निर्णय दिला जाईल आणि हसीनांच्या वकिलांनाही पुरावे सादर करण्याची संधी दिली जाईल.

3) महासत्तांचा निवडणुकांसाठी दबाव

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारवर शांततापूर्ण आणि समावेशक निवडणुका घेण्याचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. अमेरिका, चीन आणि रशिया यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली असून, भारतानेही सर्वसमावेशक निवडणुकांची मागणी केली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, आवामी लीगच्या सहभागाशिवाय निष्पक्ष निवडणुका शक्य नाहीत. शेख हसीना यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे की, त्यांच्या पक्षाला निवडणुकीपासून दूर ठेवले गेले, तर त्या आणि त्यांचे समर्थक शांत बसणार नाहीत. आजही देशात आवामी लीगचा मोठा जनाधार आहे.

4) 14 पक्षांचे मजबूत आघाडीचे संकेत

शेख हसीनांसोबत यापूर्वी निवडणूक लढवलेल्या 14 पक्षांनी पुन्हा एकत्र येत मजबूत आघाडी तयार केली आहे. हे सर्व पक्ष देशभरात संघटनात्मक पातळीवर सक्रिय झाले असून, 300 पैकी सर्व जागांवर तयारी सुरू आहे. बांग्लादेशात सरकार स्थापन करण्यासाठी किमान 151 जागांची आवश्यकता असते. या चार महत्त्वाच्या घडामोडींमुळे बांग्लादेशच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sheikh Hasina's Political Comeback in Bangladesh: Four Key Signals

Web Summary : Amidst Bangladesh's violence, Sheikh Hasina's Awami League comeback is discussed. Key developments like growing violence, judicial shifts, international pressure for inclusive elections, and a strong 14-party alliance signal potential political change.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश