शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Gilgit-Baltistan: गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 06:34 IST

Gilgit-Baltistan: कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे

इस्लामाबाद : चीनने दिलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे; कारण गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे वारंवार सांगितले आहे.

गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनला देऊन त्याच्या कर्जातून पाकिस्तान काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. मात्र पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारत व अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या विरोधामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. चीन दक्षिण आशियामध्ये आपला दबदबा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या प्रदेशात गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश येतो. तो मिळाल्यास चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली केल्यास त्यातून आंतरराष्ट्रीय तंटा निर्माण होऊ शकतो. गिलगिट-बाल्टिस्तान हा आमचा भूभाग असल्याचे भारताने याआधीच  सांगितले आहे. तो भाग पाकिस्तानने बळकाविल्याचा आरोपही भारताने केला होता. हा भाग चीनच्या ताब्यात देण्याचे ठरविल्यास गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्थानिक रहिवासी पाकिस्तानविरोधात बंड पुकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वृत्तसंस्था)

असे आहे गिलगिट-बाल्टिस्तानमधील वातावरण- गिलगिट-बाल्टिस्तान या भागात स्थानिक प्रशासनाला पाकिस्तान सरकारने कमी अधिकार दिले आहेत. तेथील महत्त्वाच्या विषयांवर पाकिस्तान सरकारच निर्णय घेते. - या भागातील लोकांचे रोजगार, पिण्याचे पाणी, शिक्षण, विद्युतपुरवठा या गोष्टींचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या आत्महत्यांपैकी ९ टक्के घटना याच भागात होतात. या परिसराचा फारसा विकास झालेला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत