शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भारत-EU कराराला म्हटलं जातंय "मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स'! ट्रम्प यांना १२ हजार व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:23 IST

यासंदर्भा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, याकडे केवळ व्यापार करार म्हणून न बघता, हा एक 'सामायिक मूल्यांचा विजय' आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही, "आज इतिहास घडला," असे म्हणत आनंद व्यक्त केला.

भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेनंत असलेला मुक्त व्यापार करार (FTA) अखेर पूर्ण झाला. या ऐतिहासिक कराराला 'मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स' म्हणून संबोधले जात आहे. या करारांतर्गत जागतिक जीडीपीचा २५ टक्के हिस्सा आणि सुमारे २ अब्ज ग्राहक एवढी विशाल बाजारपेठ एकमेकांशी जोडली गेली आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी या वृत्ताला दुजोरा दिला, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२७ जानेवारी २०२६) या कराराची अधिकृत घोषणा केली.

भारताची जागतिक पुरवठा साखळीतील भूमिका अधिक बळकट होईल -महत्वाचे म्हणजे, २०१३ मध्ये सुरू झालेली ही चर्चा अनेक मतभेदांनंतर आज फलद्रुप झाली आहे. करे तर मध्यतरी चर्चेत खंड पडला होता. मात्र, जून २०२२ मध्ये पुन्हा सुरू झालेल्या या चर्चेला आता यश आले आहे. या करारामुळे भारताला २७ युरोपियन देशांच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळून जागतिक पुरवठा साखळीतील भूमिका अधिक बळकट होईल. 

यापूर्वी, २०२३-२४ मध्ये युरोपियन युनियन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे. दोहोंमध्ये १३५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि युरोपमधील हा करार धोरणात्मक दृष्ट्य अत्यंत महत्वाचा माणला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका मावला जात आहे.

आम्ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’ पूर्ण केली -युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणून संबोधले आहे. एवढेच नाही तर, 'ही तर केवळ सुरुवात' असल्याचेही त्या म्हणाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या, "आज युरोप आणि भारत इतिहास घडवत आहेत. आम्ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’ पूर्ण केली असून, दोन अब्ज लोकांसाठी मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दोन्ही बाजूंना फायदा होईल. ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही आमची दोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करू."

कुणाला होणार सर्वाधिक फायदा - या करारानुसार, ९७ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपियन बाजारपेठेत ड्यूटी-फ्री (शुल्कमुक्त) प्रवेश मिळेल. याचा सर्वाधिक फायदा होईल तो, कापड, चामडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायन या क्षेत्रांना. 

यासंदर्भा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, याकडे केवळ व्यापार करार म्हणून न बघता, हा एक 'सामायिक मूल्यांचा विजय' आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही, "आज इतिहास घडला," असे म्हणत आनंद व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : India-EU trade deal: A 'Mother of All Trade Deals' shocks Trump!

Web Summary : India and the EU have finalized a free trade agreement, dubbed the 'Mother of All Trade Deals.' It links a vast market, strengthening India's global supply chain role. Key sectors like textiles and electronics will benefit from duty-free access.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी